कोयटे विद्यालयाला वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करून कोयटे परिवाराप्रमाणेच सामाजिक कार्यात झंवर कुटुंबाचाही खारीचा वाटा – डॉ.जगदीश झंवर.
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोयटे विद्यालयाला वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करून कोयटे परिवाराप्रमाणेच सामाजिक कार्यात झंवर कुटुंबाचाही खारीचा वाटा – डॉ.जगदीश झंवर
कोपरगाव : कोपरगाव शहरात ५ वॉटर फिल्टर प्लॅन्ट बसविले असून आज निवारा परिसरातील स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात ६ वा वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करून माझ्या वडिलांचा कोपरगाव वासियांना स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प त्यांच्या स्मरणार्थ करत आहे.असे प्रतिपादन डॉ.जगदीश लक्ष्मीनारायण झंवर यांनी केले.
स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाला स्व.लक्ष्मीनारायण सवाईराम झंवर यांच्या स्मरणार्थ श्री जगदीश झंवर व सौ संगीता झंवर यांनी कोयटे विद्यालयाला वॉटर फिल्टर प्लॅन्ट देण्यात आला. त्या प्रसंगी कोयटे विद्यालयाच्या वतीने १६ जुलै २०२२ रोजी वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे म्हणाले की, २५ वर्षापासून निवारा परिसरात विद्या दानाचे महत्त्वपूर्ण काम कोयटे विद्यालयाच्या माध्यमातून काका कोयटे आणि सौ सुहासिनी कोयटे सेवाभावी वृत्तीच्या शिक्षिकांना सोबत घेऊन करत आहे. ही खूप अभिमानाची बाब असून त्यांच्या सामजिक कार्यात झंवर कुटुंबाचा खारीचा वाटा म्हणून शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने झंवर परिवाराकडून वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करण्यात आला. या प्लॅन्टमधून वातावरणाप्रमाणे मुलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.
प्रसंगी निवाऱ्यातील ज्येष्ठ नागरिक श्री द्वारकानाथ मुंदडा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. कोयटे विद्यालयाचे संस्थापक काका कोयटे व सौ सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते डॉ.जगदीश झंवर व सौ. संगीता झंवर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी भूषविले.
स्व.लक्ष्मीनारायण झंवर यांच्यात असणारी सामाजिक कार्याविषयीची सेवाभावी वृत्ती आजही त्यांच्या कुटुंबात दिसून येते – काका कोयटे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून निवारा परिसरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सेवाभावी वृत्तीचे काम आम्ही करत आहोत. जे विद्यार्थी हे फी भरू शकत नाही किंवा कमी प्रमाणात फि भरू शकतात त्या विद्यार्थ्यांनाही आम्ही आमच्या शाळेत प्रवेश देऊन शिक्षण देण्याचे काम करत आहोत.यामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षिकांचेही तितकेच महत्त्वाचे योगदान आहे.कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक,शैक्षणिक कार्यात स्व.लक्ष्मीनारायण झंवर यांच्यासोबत असताना त्याची समाजाला काही तरी देण्याची वृत्ती त्यांचा मुलगा जगदीश आणि स्नुषा संगीता यांच्यामध्ये ही असल्याचे जाणवले.
प्रसंगी ज्येष्ठ नागरिक श्री द्वारकानाथ मुंदडा, श्री नारायण भट्टड, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीमती पुष्पलता सुतार, सेवानिवृत्त शिक्षिका वाणी मॅडम, जोशी मावशी आदींनी मनोगत व्यक्त करत कोयटे परिवाराचे सामाजिक,सहकार,शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारे योगदान शब्दात व्यक्त करून त्यांचे आभार मानले तसेच कोयटे विद्यालयाच्या अनुषंगाने गरीब व गरजू मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत एक चांगले सामाजिक कार्य करत असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.तृप्ती कासार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोयटे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ.श्री नरेंद्र भट्टड,श्री दिगंबर आप्पा लोहारकर,श्री.भालचंद्र विभूते साहेब,श्री अरूणशेठ पिंपळवाडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सुभाष पोटे, श्री ससाणे साहेब,श्री खानापुरे आर.जी. तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.उपस्थितांचे आभार नगरसेवक श्री जनार्दन कदम यांनी मानले.