समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सांगली येथील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सांगली येथील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सांगली येथील विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री. शितल मसुटगे, विभागीय अधिकारी श्री. अजय चौगुले, श्री. सुधीर ऐतवडे, श्री. जितेंद्र पाटील,आय.टी विभाग प्रमुख श्री.शितल खोत,आय.टी विभाग वरिष्ठ अधिकारी श्री. संकेत चौगुले, अंतर्गत ऑडिटर श्री.सचिन मगदूम, शाखाधिकारी श्री.तुषार राजोबा आदी पदाधिकाऱ्यांनी २८ जुलै २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम,समता रिकव्हरी पॅटर्न,सोनेतारण विभाग,समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर,हँडवॉश, उटणे, फुलवाती, समई वाती,अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली. त्यानंतर संस्थेचे चेअरमन काका कोयटे,जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, ठेव विभाग प्रमुख श्री संजय पारखे,वसुली अधिकारी श्री जनार्दन कदम , अधिकारी,कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली.
नंतर समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री शितल मसुटगे यांचा सत्कार केला.इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार ठेव विभाग प्रमुख श्री संजय पारखे यांच्या हस्ते करण्यात आला.
समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत चेअरमन,संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.