ब्रेकिंगमहाराष्ट्र

विविध कार्यकारी सोसायटी व संस्थांमध्ये बदलत्या कायद्यांचा सदुपयोग करण्यासाठी सज्ज व्हावे – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

विविध कार्यकारी सोसायटी व संस्थांमध्ये बदलत्या कायद्यांचा सदुपयोग करण्यासाठी सज्ज व्हावे – काका कोयटे,अध्यक्ष

कोपरगाव : देशातील विविध कार्यकारी सोसायटी संस्थांचे रूपांतर बहुराज्यीय व बहुउद्देशीय संस्थांमध्ये करणारा कायदा केंद्र सरकार करणार असून या कायद्यामुळे देशातील सहकारी चळवळीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे हे आवाहन स्वीकारण्यासाठी तसेच संधीचा सदुपयोग करून घेण्यासाठी ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायटी व संस्थांनी ही सज्ज व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गोदावरी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन श्री पंडितराव चांदगुडे यांचा ६६ वा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सहकाराचे स्वतंत्र मंत्रालय तयार केले या सहकार मंत्रालयाच्या कारभार मा.श्री.अमित शहा यांच्यासारख्या वजनदार मंत्र्याकडे दिला आहे. यांचा सहकार चळवळीचा गाढा अभ्यास असल्याने भविष्यात सहकार चळवळ वाढणार आहे.

गुजरात मधील अमूल,इफको लिज्जत यांसारख्या संस्थांनी देश पातळीवर सहकारात मोठे काम उभे केले आहे. असेच काम महाराष्ट्रात देखील सहकारी कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी पतसंस्थांनी उभे केले आहे. हेच काम जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही पोहोचविण्यासाठी केंद्र शासन विचाराधीन आहे.

केंद्र शासनाच्या सहकारी चळवळीतील कामकाजात बदल होत असताना देशाचे सहकार मंत्री मा.श्री अमित शहा व देशातील सहकाराचे गाढे अभ्यासक मा.श्री शरद पवार यांनी सहकाराविषयी आयोजित केलेल्या विविध परिषदांमध्ये मला सहभागी करून घेत महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळी विषयी विविध प्रश्नांवर, समस्यांवर मत मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

विविध कार्यकारी सोसायटी यांना शिक्षण संस्था, हॉस्पिटल उभारता येणार आहे तसेच विविध प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून कामकाजाच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सुशिक्षित करण्यासाठी सहकारी पतसंस्थांची शिबिरे, प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे.बँकांचे बिझनेस फॅसिलिटर होणे तसेच विविध कार्यकारी सोसायटी यांनी ठेवी स्वीकारणे,कर्ज देणे या कार्याबरोबरच सभासदांच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी विविध योजना व उपक्रम ही केंद्र व राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. विविध कार्यकारी सोसायटी यांना वेअर हाऊसेस व लॉकरची सुविधाही ग्रामीण भागात उपलब्ध करून देता येणार आहे.

वरील सर्व सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी सोसायटीतील कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण शिबिराची गरज निर्माण झाली आहे. त्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी योग्य प्रशिक्षण घ्यावे.त्याचबरोबर सहकारी पतसंस्था, सहकारी, सरकारी बँका यामधील कामकाजाचे स्वरूप,त्यातील फरक यात बदल होणार असून बँकांप्रमाणेच सहकारी पतसंस्थांच्या कामातही बदल होणार आहे. डिमांड ड्राफ्ट,पॅन कार्ड सारख्या सुविधा कालबाह्य होणार असून मोबाईल बँकिंग, क्यू.आर.कोड यासारख्या आधुनिक सुविधांच्या माध्यमातून कामकाज सुरू राहणार आहे. या सेवा ग्रामीण भागातील पतसंस्था देत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी,कर्मचारी यांनी विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सभासदांना सेवा देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदंबा पतसंस्थेचे मॅनेजर श्री ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष व समता नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन काका कोयटे,तालुका विकास अधिकारी श्री ए डी काटे,कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री विश्वासराव आहेर, श्री ज्ञानदेव मांजरे स्टेट बँकेचे घेमुड साहेब, श्री रामभाऊ बनकर, गोदावरी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन श्री पंडितराव चांदगुडे ,सरपंच निळकंठ यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.तसेच चासनळी, धामोरी, कोळपेवाडी परिसरातील सहकारी पतसंस्था व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री कैलास थोरात यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे