ब्रेकिंगमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

सातारा जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची समताच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री. रामभाऊ लेंभे, कार्यकारी संचालक श्री भावेश ढमाळ, सरव्यवस्थापक (कर्ज,वसुली व नियंत्रक) श्री जयंत साळुंखे, प्रशासन विभाग प्रमुख श्री धनाजी जाधव, विभागीय अधिकारी श्री सुनिल दरेकर, श्री राहुल गोरे, श्री सुनिल गोळे, श्री हरिदास कदम, श्री जितेंद्र इथापे, श्री मनोज लेंभे, श्री महेश कदम, मार्केटिंग अधिकारी श्री प्रमोद धुमाळ आदी पदाधिकाऱ्यांनी ०८ ऑगस्ट २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग.

समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश,उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली. त्यानंतर संस्थेचे चेअरमन काका कोयटे,संचालक श्री संदीप कोयटे, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, शाखाधिकारी श्री आप्पा कोल्हे यांनी सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री रामभाऊ लेंभे यांचा सत्कार केला.इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार संचालक श्री संदीप कोयटे, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांच्या हस्ते करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री रामभाऊ लेंभे व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली तर समता पतसंस्था करत असलेल्या आर्थिक प्रगतीचे कौतुक करत संचालक श्री संदीप कोयटे यांना पेढा भरविला.

समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत चेअरमन,संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे