देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

“डॉ.हेडगेवार पतसंस्थेची सातत्यपूर्ण वाटचाल आणि सभासदकेंद्री कार्यपद्धती कौतुकास्पद” : काका कोयटे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

“डॉ.हेडगेवार पतसंस्थेची सातत्यपूर्ण वाटचाल आणि सभासदकेंद्री कार्यपद्धती कौतुकास्पद” : काका कोयटे

घोटी : नाशिक कार्यक्षेत्रात सभासदांचा विश्वास संपादन करत सहकाराच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संस्थेची सातत्यपूर्ण वाटचाल आणि सभासदकेंद्री कार्यपद्धती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील डॉ. हेडगेवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

सहकारी पतसंस्थांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. मात्र, आधुनिकतेसोबत संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे काका कोयटे यांनी सांगितले.

सहकारी पतसंस्था या सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेने सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कामकाज करणे आवश्यक आहे. बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक वातावरणात पतसंस्थांनी आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याबरोबरच आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि सक्षम व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे.

वार्षिक अहवाल हा संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाचा आरसा असतो. संस्थेची आर्थिक वाटचाल, कामकाज आणि प्रगती याबाबत सभासदांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे वार्षिक अहवालाच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज सभासदांसमोर मांडणे ही सहकारातील महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी संचालक मंडळ, पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासदांना शुभेच्छा देत संस्था भविष्यातही अधिक सक्षमपणे प्रगती करेल, असा विश्वास काका कोयटे यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे संचालक हेमंत सुराणा, गोरखजी वालझाडे, सुरेश दुर्गुडे, राजेंद्र भंडारी, संदीप शहाणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे