ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता महिला बचत गटाचा तिरंगा ध्वज निर्मितीचा उपक्रम कौतुकास्पद – श्री वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता महिला बचत गटाचा तिरंगा ध्वज निर्मितीचा उपक्रम कौतुकास्पद – श्री वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित समता महीला बचत गट निर्मित केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ना नफा,ना तोटा तत्वावर १० हजार तिरंगा ध्वज बनविले आहे.काका कोयटे समता चॅरीटेबल ट्रस्ट,समता पतसंस्था, व्यापरी महासंघ,किराणा मर्चंट असोसिएशन या संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सतत विविध कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आघाडीवर असतात. त्या पैकीच हा उपक्रम ही कौतुकास्पद असून यातून प्रत्येक घरात तिरंगा ध्वज जाणार असून देशाविषयी असणारे प्रेम द्विगुणित होणार आहे.असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी केले.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोपरगाव शहरातील गांधी चौक शाखेसमोर समता महिला बचत गट निर्मित तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांच्या हस्ते करण्यात आला.त्या प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना काका कोयटे म्हणाले की,भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात,पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना त्यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायम स्वरूपी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात राहावी या उद्देशाने केंद्र शासनाने या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता महीला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांनी केले.त्या म्हणाल्या की,भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. कोपरगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना तिरंगा ध्वज आज शुभारंभ केलेल्या विक्री केंद्रात मिळणार आहे. समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात ०८०६९१६५५५५ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर ही उपलब होणार आहे. सहकार उद्योग मंदिरातील समताज सहकार मिनी मॉलमध्ये आणि समता पतसंस्थेच्या प्रत्येक कार्यालयात ही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

समता पतसंस्थेचे चेअरमन आणि समता महिला बचत गटाचे मार्गदर्शक काका कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजकुमार बंब,लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष श्री परेश उदावंत, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव श्री प्रदीप साखरे, सदस्य श्री किरण शिरोडे, श्री नंदकुमार डागा, श्री महावीर सोनी,समता पतसंस्थेचे संचालक श्री गुलशन होडे,कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे, सौ.रंजना बंब, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनचेे पदाधिकारी व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव श्री प्रदीप साखरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे