ब्रेकिंगमहाराष्ट्र

समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील – श्री विजय बोरुडे, तहसिलदार

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील – श्री विजय बोरुडे, तहसिलदार

कोपरगाव : बाल वयात विद्यार्थ्यांमधील गुण विकसित होत असतात.आजचा समताचा विद्यार्थी उद्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात स्वतःमधील विकसित झालेल्या नेतृत्व गुणांनी प्रगती करणार असून भारत देशाचा सुजाण नागरिक बनेल.त्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांना बाल वयातच विद्यार्थी परिषदेत विविध समित्यांवर नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार श्री.विजय बोरुडे यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक काका कोयटे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी लोकशाही मूल्यांची रुजवण व्हावी यासाठी विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी स्कूल अंतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक समिती मार्फत विद्यार्थ्यांमधून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले, त्यांची मुलाखत घेण्यात आली आणि आज शपथ घेऊन पद ग्रहण करत विविध पदांवरून त्यांची जबाबदारी देखील समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी पार पाडणार आहेत.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषदेत समता स्कूलच्या इ.९ वी तील अजिंक्य वठोरे याची मुलांमध्ये तर मुलींमध्ये अनुष्का ठोळे हिची मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.रुपल पाटील, शार्विल शिरोडे, मदनलाल लोंगणी, जिया बोथरा, भावेश अग्रवाल, आरुष सोनी, साई तनपुरे, यश दिवेकर तर इ.८ वी तील राजवीर आढाव, नूतन लाहोटी, दर्शिल अजमेरे, अदिती सोनवणे, अन्वी उंबरकर, अर्निशा कोठारी, मुक्ता मुंजे, आर्यन कुमार, प्रथमेश भट्टड, गिरिजा निर्मळ, ईश्वरी गोडसे, स्नेहा गुजराणी या विद्यार्थी-विद्यार्थिनींची विविध समित्यांवर निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ ऑगस्ट २०२२ रोजी तहसिलदार श्री.विजय बोरुडे व कोपरगाव तालुका सिंधी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सिमरन खुबानी यांच्या हस्ते समता स्कूलच्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन शपथ ग्रहण सोहळा समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.शपथ ग्रहण सोहळ्याला विद्यार्थ्यांसह पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

सोहळ्याची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य श्री.समीर आत्तार यांनी केले.समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विजय बोरुडे यांचा सत्कार करण्यात आला, तर सौ सिमरन खुबाणी यांचा सत्कार समता स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी केला.यानंतर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध संचालन करून तालबद्ध स्वरूपात पद ग्रहण केले.प्रसंगी विद्यार्थी परिषदेवर निवड झालेल्या प्रत्येक सदस्याने निष्ठेने शाळेची सेवा करण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.शोभा गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली इ.९ वी तील विद्यार्थिनी अनुष्का जपे व वृष्टी कोठारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख श्री.रोहित महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिक्षिका सौ.चैताली पटारे यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे