ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

 

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास होणे हे तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा शारीरिक आणि मानसिक विकास करावा. खेळ हा जीवनातील महत्त्वाचा प्रकार आहे.बाल वयातच खेळाडू वृत्ती विकसित होऊन समताचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करतील.असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी केले.

समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

समताज स्पोर्ट चॅम्प विशेषांकाचे  प्रकाशन करताना कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती संदीप कोयटे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. त्यांनी ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली असून जगाच्या इतिहासात आपले व आपल्या भारत देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.तसेच १९ व्या शतकामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी या खेळासाठी भारत देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या यशाबद्दल भारत सरकारने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील पद्मभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्काराने देखील गौरवले आहे.भारत सरकारच्या वतीने आजच्या काळातील उत्कृष्ट खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सबंध भारतभर आपली क्रीडा संस्कृती वाढावी, नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो.

कार्यक्रमाची सुरुवात समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे व स्कूलचे उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांच्या हस्ते प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची प्रतिमा व खेळाच्या साहित्यांचे पूजन करून झाली.कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते क्रीडा दिनाच्या अनुषंगाने प्रकाशित करण्यात येणारे ‘समताज स्पोर्ट चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. क्रीडा शिक्षक श्री.रोहित महाले यांनी समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये मिळविलेल्या यशाची चित्रफीत सादर करत समताच्या इतर विद्यार्थ्यांचे खेळाविषयी असणारे आकर्षण आणि मनोबल वाढविले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इ.८ वीतील विद्यार्थी आर्यन पटारे व दर्शील अजमेरा यांनी केले. या कार्यक्रमाला समता स्कूल मधील क्रीडापटू, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शैक्षणिक समन्वयक सौ.सारिका अग्रवाल यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे