ब्रेकिंगमहाराष्ट्र

काका कोयटे यांची ही निवड भारताच्या सहकाराचा सन्मान – श्री.शरदचंद्र पवार, सहकार नेते

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

काका कोयटे यांची ही निवड भारताच्या सहकाराचा सन्मान – श्री. शरदचंद्र पवार,सहकार नेते

कोपरगाव : महाराष्ट्रातील पतसंस्थांची सहकार चळवळ बळकट करून भरभराटीस आणण्याचे काम महाराष्ट्रातील राज्य पतसंस्था फेडरेशन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून महाराष्ट्रातील पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनमधील एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) या ३६ देशांचे नेतृत्व करणाऱ्या शिखर संस्थेवर निवड झाल्यामुळे भारताच्या सहकाराचा सन्मान जगभर झाला असून त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्व अशा व्यक्तिमत्त्वाची एक नवीन ओळख झाली असल्याचे गौरवोद्गार श्री.शरदचंद्रजी पवार यांनी काढले.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे महेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता परिवाराचे संस्थापक,अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या निवडणूकीमध्ये ३६ देशांची शिखर संस्था असलेल्या एशियन कॉन्फडरेशन क्रेडिट ऑफ युनियन (ॲक्यू) चे संचालक आणि बहुमताने खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल भारत देशाचे सहकारातील नेते श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुच्छ देऊन यथोचित सन्मान करत सत्कार करण्यात आला.

प्रसंगी महेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसा.चे अध्यक्ष श्री.दत्तात्रय गावडे, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री.सुरेश वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.घनश्याम शेलार,जामखेड तालुक्यातील ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे अध्यक्ष श्री.आजिनाथ हजारे,आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन श्री.शिवाजी कपाळे,नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष श्री. कडूभाऊ काळे, व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन श्री.अभिनाथ शिंदे आदींसह श्रीगोंदा तालुक्यातील विविध पतसंस्था आणि मल्टीस्टेटचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे