देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

मनमाडमध्ये समता पतसंस्थेच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

मनमाडमध्ये समता पतसंस्थेच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

मनमाड : राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमाड शाखेच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश तथा काका कोयटे होते. यावेळी सत्यनारायण महापूजा आणि फीत कापून उद्घाटन तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

“समता पतसंस्थेची ओळख केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, विश्वास, पारदर्शकता आणि सभासदाभिमुख सेवेमुळे ती राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्था बनली आहे. बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.” – काका कोयटे

४० वर्षांची गौरवशाली परंपरा, १००० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आणि एक लाखांपेक्षा अधिक सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांना अधिक आधुनिक, सुरक्षित व दर्जेदार बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनमाड येथे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त कार्यालय सुरू केले आहे.

प्रसंगी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समता नागरी सहकारी पतसंस्थेने विश्वास, पारदर्शकता आणि उत्कृष्ट सेवेमुळे सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनमाडमध्ये सुरू झालेले हे नवीन अत्याधुनिक कार्यालय असलेली शाखा परिसरातील नागरिकांसाठी निश्चितच लाभदायी ठरेल. संस्थेची प्रगती अशीच अखंड सुरू राहो,” अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी सत्यनारायण महाप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. नवीन शाखेच्या उद्घाटनामुळे मनमाड परिसरातील सभासद व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या विस्तारातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, प्रकाश गवळी, बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड, उबाटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण नाईक, शहर उपाध्यक्ष राकेश आहेरराव, शहर संघटक योगेश परदेशी, विजय मिश्रा, गोविंद रसाळ, भाग्य लक्ष्मी पतसंस्थेचे संचालक प्रदिप बोगावत, सुरेश बारसे छत्रपती पतसंस्थेचे शाखाधिकारी शाम गरुड, गोविंदा पतसंस्थेचे अरविंद शिंदे, धनराज उगले, पंकज सुरवडे, विलास हुकिरे, विजय उबाळे, नगरसेवक राकेश ललवाणी, लोकेश साबळे, ललित रसाळ, राजाभाऊ पगारे, सुभाष माळवतकर, दिलीप नरोडे आदींसह संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक गिरीश सोनेकर, संदीप कोयटे, मुख्य व्यवस्थापक सचिन भडुड, शाखाधिकारी आतिश गवळी, कर्मचारी, सभासद, व्यापारी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व अंदरसुल अर्बन, अमृत पतसंस्था, आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे