देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

पिंपळगाव बसवंत येथे समता पतसंस्थेच्या २९ व्या शाखेचे उद्घाटन; अवघ्या २० मिनिटांत सोने तारण कर्जाची सुविधा

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

पिंपळगाव बसवंत येथे समता पतसंस्थेच्या २९ व्या शाखेचे उद्घाटन; अवघ्या २० मिनिटांत सोने तारण कर्जाची सुविधा

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या २९ व्या शाखेच्या अत्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नासिक मर्चंट को-ऑप.बँक (नामको) चे चेअरमन सोहनलाल भंडारी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. सकाळी सत्यनारायण महापूजा मधुकर साखरे व सौ.छाया साखरे यांच्या हस्ते करण्यात आली. दिलीप घोडके यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना नामकोचे चेअरमन सोहनलाल भंडारी म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून पिंपळगावमध्ये कार्यरत असलेली समता पतसंस्था विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख सेवा देत आहे. विशेषतः अवघ्या २० मिनिटांत सोने तारण कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा ही संस्थेची मोठी जमेची बाजू आहे. येत्या काळात संस्था अधिक मोठ्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास आहे.”

अध्यक्षीय भाषणात चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा देताना सांगितले की, समता पतसंस्थेने देशभरात उल्लेखनीय आर्थिक उलाढाल करत विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तत्काळ सोने तारण कर्ज उपलब्ध करून देणारी अग्रगण्य संस्था म्हणून समतेची ओळख असून, पिंपळगावसारख्या व्यापारी शहरात शाखेचा विस्तार होणे ही अभिमानाची बाब आहे.

काका कोयटे पुढे म्हणाले की, कोपरगावप्रमाणेच पिंपळगावमध्येही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील. सोने तारण कर्जाच्या नावाखाली काही खासगी कंपन्यांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी पारदर्शक, विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.

याप्रसंगी पिंपळगाव बसवंत नगरपालिका उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक गणेश बनकर, जंगम ज्वेलर्सचे संचालक नंदू शेठ जंगम, विलास निळकंठ, प्रदीप चौधरी, राजप्पा चौधरी, गणेश घोडके, जितेंद्र घोडके, पिंपळगाव लिंगायत समाज अध्यक्ष अंबादास आंधळकर व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

तसेच संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक कचरू मोकळ, दीपक अग्रवाल, संदीप कोयटे, गिरीष सोनेकर, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, सौ. सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, प्रदीप साखरे, सिनियर ऑफिसर किरण गायकवाड, संकेत वाळेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे