ब्रेकिंगमहाराष्ट्र

समताचा फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार होत आहे – श्री वसंतराव जाधव, चेअरमन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताचा फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार होत आहे – श्री.वसंतराव जाधव,चेअरमन

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेत आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानापैकी समतातील मोबाईल बँकिंग, व्हाउचरलेस बँकिंग प्रणाली, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, क्यू.आर.कोड सुविधा, समता लिक्विडिटी बेस्ट प्रोडक्शन फंड या ग्राहक, सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधा बदलत्या काळानुसार संस्थांमध्ये बदल करण्यासाठी विशेष महत्त्वाच्या आहेत.यापैकी फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम हे समता पतसंस्थेचे असे तंत्रज्ञान आहे की, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक व्यवहार होतो आणि ग्राहक, सभासदांना या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमुळे समता विश्वासही देत आहे.असे मत महारुद्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री वसंतराव जाधव यांनी व्यक्त केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील महारुद्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.वसंतराव हरी जाधव, कार्यकारी संचालक श्री. बाबुराव महादू जाधव, क्रियाशील सभासद श्री.कारभारी कचरू जाधव, श्री.बाबुराव पुंडलिक जाधव, जनरल मॅनेजर श्री.देविदास रुंजाजी जाधव आदी पदाधिकारी, अधिकारी, क्रियाशील सभासद यांनी १३ सप्टेंबर २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश,उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ, मास्क, पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली. नंतर कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी श्री.आप्पा कोल्हे् , कर्मचारी यांनी त्या त्या विभागाची माहिती दिली.

त्यानंतर समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची ॲक्यू वर संचालक व खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल महारुद्र पतसंस्थेच्या वतीने चेअरमन श्री.वसंतराव जाधव यांच्या हस्ते तर समताच्यावतीने समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, सक्रिय सभासद यांचा संयुक्तपणे सत्कार करण्यात आला.

समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत चेअरमन,संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे आभार जनरल मॅनेजर श्री.देविदास जाधव यांनी मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे