काका कोयटे यांचे कार्य तरुणांना स्फूर्ती व दिशा देणारे – श्री.मच्छिंद्र टेके, माजी सभापती
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
काका कोयटे यांचे कार्य तरुणांना स्फूर्ती व दिशा देणारे – श्री.मच्छिंद्र टेके, माजी सभापती
कोपरगाव : शिवाजी रोड वरील किराणा, फटाक्यांच्या दुकानासह काका कोयटे यांचा कष्टप्रद जीवन प्रवास सुरू झाला होता. व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन द्वारा शहरातील छोटे व्यापारी, किराणा दुकानदार यांना एकत्र करून प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून दिला.त्या नंतर समता पतसंस्थेची स्थापना करून सहकारात नवीन ओळख तयार केली आणि किराणा दुकानदार, व्यापारी यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून दिली.काकांच्या कष्टांचे यश म्हणजे त्यांची ही निवड आहे.आशिया खंडातील जागतिक पातळीवर झालेली निवड सहकार क्षेत्रात प्रथमच भारताला मिळालेला बहुमान आहे.त्यांचे सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात असणारे कार्य कौतुकास्पद असून आजच्या तरुण पिढीला लाजवेल असे असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी स्फुर्ती आणि दिशा देणारे आहे.असे गौरोद्गार कोपरगाव तालुक्यातील वारी येथील प्रतिष्ठित नागरिक व कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मच्छिंद्र टेके यांनी काढले.
थायलंड देशातील बँकॉक येथे संपन्न झालेल्या एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू) च्या ४१ व्या जनरल मिटिंग मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि समता परिवाराचे संस्थापक,अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची ॲक्यूचे संचालक व खजिनदार पदी निवड झाली.त्याबद्दल त्यांचा ९ सप्टेंबर २०२२ रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी येथे व्यापारी असोसिएशन,अंबिका संस्था समुह आणि काकासाहेब कोयटे मित्र मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मच्छिंद्र टेके बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना काका कोयटे म्हणाले की,वारी गावातील व्यापारी असोसिएशन,अंबिका संस्था समुह आणि काकासाहेब कोयटे मित्र मंडळाने माझा केलेला जाहीर सत्कार अविस्मरणीय आहे. हा सत्कार पतसंस्था चळवळीत माझ्यासोबत काम करणारे आणि समता परिवाराचा सन्मान असून मी सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याला प्रेरणा देणारा आहे.मला परदेशात मिळालेल्या या सुवर्ण संधीचा सदुपयोग करून भारत देशाच्या नावाबरोबर कोपरगाव तालुक्याचेही नाव सातासमुद्रापार घेऊन जाणार आहे.
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मच्छिंद्र टेके आणि श्री. बाबुराव गोर्डे यांनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.जुन्या आठवणी शब्दातून व्यक्त करताना ते अतिशय भावूक झाले होते.
तसेच वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वारी परिसरातील निराधांरासाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्यात आलेल्या मोफत मदत सेवा केंद्रास ही काका कोयटे व कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनीताई कोयटे यांनी सदिच्छा भेट देत कार्याची माहिती घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.बाबुराव गोर्डे होते. गोदावरी बायोरिफायनरीचे संचालक श्री.सुहास गोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री.पोपट गोर्डे ,श्री.सुखदेव मुसळे,श्री बाळासाहेब पालवे, लोकमतचे उपसंपादक श्री. रोहित टेके, वारीतील प्रतिष्ठित व्यापारी श्री. नरेंद्र ललवाणी, श्री.प्रकाश करडे,श्री.अशोकआप्पा काजळे,श्री रमेश टेके,श्री.गोकुळ मेहेरे,स्वयंसेविका तथा ग्रामपंचायत सदस्या सौ.सुवर्णाताई गजभिवे, सौ स्मिता ( काकीजी ) काबरा, श्री.अनिरुद्ध जाधव, श्री.रामकृष्ण टेके यांच्यासह वारी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रकाश गोर्डे यांनी केले.उपस्थितांचे आभार श्री.विशाल गोर्डे यांनी मानले.