ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

के.के.एनर्जी एक्सप्रेस..(K.K.Enarji Express) – श्री.भरत मोरे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

 के.के.एनर्जी एक्सप्रेस.. (KK Enarji Express…)

जमिनीवरून सुसाट वेगानं अवकाशाला,.. सोबत जोडलेले डबे घेवून गवसणी घालणारी ट्रेन कुणी पाहीली का..? …. होय,..मी पाहीली आणि असंख्य नयनांनी देखील पाहीली,.. ईतकच नव्हे तर सोबतच्या जोडलेल्या डब्यांत सुखाचा प्रवासही कैक प्रवाश्यांनी केला,..कारण प्रवाश्यांच्या कुटूंबाची काळजी प्रवासाच्या प्रत्येक वळणावर आपुलकीने घेतली गेली,..हिच ती सुसाट ट्रेन जी कोपरगावच्या शिवाजी रोडवरील स्टेशन मधुन सुरवातीला कमी वेगाने निघाली ,… आत्मविश्वासाच्या ईंधनावर प्रवास सुरू झाला,… विश्वासू संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या मित्रांचा डबे जोडण्यासाठी मजबूत कड्यांचा म्हणून वापर करून कधीही घात अपघातात शेवटपर्यंतच्या डब्यापर्यंत कुठलाही डबा रूळावरून घसरणार नाही ईतकी भक्कम, मजबूत समता ठेवून संघटीत एक निर्णायक भूमिका घेत महाराष्ट्राभर अनेक सर्वसामान्य व्यापा-यांना, उद्योजकांना, सर्व क्षेत्रातील होतकरू तरुणांना स्वबळावर उभं राहण्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून एक संघटीत शक्तिस्थळ निर्माण केली…,धन्य त्या माता पित्याला असा पुत्र पोटी जन्माला घालून कोपरगावचे नाव आज बॅंकाॅक पर्यंत आपल्या भारत देशाचं नेतृत्व करताना दिसत आहे,….गर्व आहे, अभिमान आहे,आणि चंद्र सुर्य तारे असेपर्यंत प्रत्येक ह्रदयात कौतुकच राहील अशी आजची जगभरात कोपरगावचा डंका वाजवणारी KK Enarji Express म्हणजेच आदरणीय काकासाहेब कोयटे,…

काळोखातून प्रकाशाकडे नेणारे,..साथ देणा-यांना प्रगतीच्या शिखरावर सोबती घेवून त्यामाध्यमातून समाजहीताचे भान ठेवणे व शहराचे विकासाचा ध्यास घेणे,..ना पदाचा मोठेपणा,..ना खुर्चीचा गर्व,.. अभिमान आहे आम्हा कोपरगाव करांना या KK Enarji Express चा,..आमच्या काकासाहेब कोयटेंचा…, ना राजकारणाचा विचार,ना प्रसिद्धची लालसा फक्त आणि फक्त माझ्या जन्मभूमीचा,माझ्या शहराचा,माझ्या कोपरगावचा विकास हेच आयुष्याचा मंत्र समजून अर्थकारणाला महत्व दिले,त्याचे महत्व तरूण व्यावसायिकांना पटवून दिले आणि शहरातील छोटे मोठे व्यापारी संघटीत केले,..शहराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी वाटेल ते शर्थीचे प्रयत्न सुरू केले,.. त्या व्यतिरिक्त मंग पुराचं संकट असेल,आत्ताच येवून गेलेलं कोरोनाचं महाकाय संकट असेल, बेरोजगारीचे संकट असेल, होतकरू तरुणांना स्फूर्ती देण्याचं माध्यम असेल,..यात काकासाहेब कोयटेंचा सिंहाचा वाटा या अति महत्त्वाच्या मानव हिताच्या आणि समाज कार्यात नेहमीच राहीला आहे,.. शहरातील विधवा असेल, किंवा बेरोजगार महीलांना गृह उद्योग निर्माण करून देवून त्यांची मोठ्या उद्योजकांच्या दिशेने वाटचाल सुरू करून देणे असेल,..यात मी माझंच उदाहरण देतो,..मी स्वलिखीत आणि मराठी सिनेमाची निर्मिती करत असताना काकासाहेब कोयटे यांनी मला बोलावून घेतले,सिनेमाची कथा एैकुन घेतल्यानंतर माझे कौतुक करत कोपरगावचे नाव जगात सिनेमाच्या माध्यमातून झळकू दे,असा आशिर्वाद दिला आणि माझे सिनेमाचे बजट पाहता मला भरीव अशी आर्थिक मदतही केली,…अश्या या कलाकारांची जाणीव असलेल्या , दुरदृष्टी असलेल्या निस्वार्थी नेतृत्व काकासाहेब कोयटे यांना आई भवानी ताकद दे,… काकासाहेब कोयटे हे त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यामुळे खरे तर कोपरगावचे अनेक भाग्यविधात्या पैकी एक भाग्यविधाते नक्कीच आहे,यात तिळ मात्र शंका नाही,…

पतसंस्था फेडरेशनची चळवळ महाराष्ट्र भर उभारून,..अनेक होतकरू तरूणांना आर्थिक पाठबळ दिले आणि फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोपरगावचे काकासाहेब कोयटे एक कुशल नेतृत्व म्हणून ओळखलं जाऊ लागले,.. त्याचबरोबर स्वताहाच्या समाजाला देशभर संघटीत केले आणि समाजाच्या न्यायहक्कासाठी लढा पुकारला आणि त्यातही काकासाहेब कोयटे यांनी आगेकूच करत यशस्वी वाटचाल केली ,…आणि ख-या अर्थाने देशात कोपरगाव चा डंका वाजवलाचं,… सिनेसृष्टी,खेळविश्व, राजकारणात सगळीकडे काकांचे विश्वासाचे आणि प्रमाचे संबंध आहेत आणि त्याचा उपयोग काकांनी कोपरगाव साठी नक्कीच केला याची प्रचीती काकांच्या सहवासात राहून येतेच हि काळ्या दगडावरची रेघ आहे,…

देशात नावलौकिक करून काकासाहेब कोयटे तिथेच थांबले नाही,…तर त्यांनी शिवाजी रोड ते थेट आता बॅंकाॅक थाडलॅंड येथे सुरू असलेल्या एशियन क्रेडिट युनियनच्या ४१ व्या जनरल मिटींगमध्ये थेट आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व केले , आणि पुन्हा एकदा कोपरगावच्या लौकीकात एक मानाचा तुरा रोवण्याचं काम काकासाहेब कोयटे यांनी केले ,.‌आणि एक सर्वसामान्य माणसाने एकदा ठरविले तर तो काय करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आज जगासमोर ठेवले आहे,…माणसं ओळखणे आणि ते कसे जोडणे,..त्यांच्या बुध्दी प्रमाणे,शरीराच्या ताकदीनुसार कामाचा भार टाकणे आणि जनहितार्थ कामे करून घेणे ही शिवछत्रपतींची निती वापरली आणि आज सहकाराच्या माध्यमातून लाखो घरांत चुली पेटवली,.. रोजगार दिला,.. व्यापारी,खेळाडू,कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले,….
आम्ही एक कोपरगावकर म्हणून,एक शिवसैनिक म्हणुन आम्हाला काकासाहेब कोयटे यांचा अभिमान वाटला आणि आहेच, त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी काकासाहेब कोयटे यांची वेळ घेवून, कोपरगाव शहरातील त्यांची समता नागरी पतसंस्था येथे भेट घेवून यथोचित सन्मान केला,….. सदरील शब्द हे माझ्या अनुभवावरून मी लिहीतो आहे,..तसं सहकार भूषण काकासाहेबांचे कार्य हे असंख्य पानांवर कितीही लिहीले तरी कमीच आहे,.. …असो,..अश्या या बहुजनांचा विचार करणा-या नेतृत्वाला उदंड आणि निरोगी दिर्घायुष्य लाभू दे अशी आई भवानी चरणी प्रार्थना करतो,… आणि ईथेच थांबतो.
जय हिंद ??
जय महाराष्ट्र ?

श्री.भरत आसाराम मोरे.
कोपरगाव शहर शिवसेना माजी शहरप्रमुख.
एस टी कामगार सेना अध्यक्ष कोपरगाव आगार.
मराठी चित्रपट लेखक आणि निर्माता.
मेडीकल व ऑप्टिकल व्यावसायिक.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे