देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

समतात शिवजयंती साजरी; बाळासाहेब आढाव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समतात शिवजयंती साजरी; बाळासाहेब आढाव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी नगरसेवक तथा कुलस्वामिनी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब आढाव यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कोपरगाव नगरपालिका विद्यमान स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रुईकर, नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौ. निर्मला आढाव, सोमनाथ आढाव, दिनकर झावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ला येथे जन्मलेल्या शिवरायांनी स्वराज्याची पाया भरणी केली. १६७४ साली रायगड किल्ला येथे झालेला त्यांचा राज्याभिषेक हा मराठी इतिहासातील सुवर्ण क्षण मानला जातो.

मनोगतात माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव यांनी समता पतसंस्थेच्या विविध लोकाभिमुख योजना व उपक्रमांचे कौतुक करत सांगितले की, “समता पतसंस्था ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. सभासदांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना स्तुत्य असून महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करून संस्था समाज प्रबोधनाचे कार्यही करत आहे.”

कोपरगाव नगरपालिका विद्यमान स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रुईकर यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणजे सुशासन व लोककल्याण. समता पतसंस्थेनेही त्याच धर्तीवर विविध उपक्रम राबवत सामाजिक जाणीव जपली आहे. प्रत्येक समाज सुधारक, महापुरुषाची जयंती समताच्या मुख्य कार्यालयात साजरी करणे ही संस्थेची प्रेरणादायी परंपरा आहे.”

अध्यक्षीय भाषणात काका कोयटे यांनी शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन सहकार व समाज कार्यात अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे