समता पतसंस्थेच्या पुंडलिक नगर शाखेचे थाटात उद्घाटन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


समता पतसंस्थेच्या पुंडलिक नगर शाखेचे थाटात उद्घाटन

छत्रपती संभाजी नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या व राज्यातील ग्रामीण भागातील अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ४० वर्षापासून ग्राहक सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या, ११०० कोटी रुपयांहून अधिक ठेवी असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर येथे नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

या शाखेचे उद्घाटन भाजपचे नगरसेवक विश्वनाथ स्वामी, लोकमत मीडिया ग्रुप छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी मुळे, ज्ञानेश्वर खर्डे, भगवान तिळकरी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. तर माजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दिलीप गौडर, उद्योजक सोमनाथ साखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नवीन शाखेमुळे परिसरातील नागरिकांना सुलभ, विश्वासार्ह व सरकारी बँकेतही मिळणार नाही अशी आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध होणार असून, ठेवीदारांच्या ठेवींना समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत सुरक्षितता ही मिळणार आहे. तसेच सहकारी पतसंस्था चळवळीला आणखी बळ मिळणार आहे – काका कोयटे, चेअरमन
या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे म्हणाले की, “समता नागरी सहकारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून, सर्वसामान्यांच्या स्वप्नांना बळ देणारी सहकाराची चळवळ आहे. गेल्या ४० वर्षांच्या वाटचालीत प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सभासदांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल राहिले आहे. पुंडलिक नगर येथे सुरू झालेल्या या नव्या शाखेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना आधुनिक, सुलभ व विश्वासार्ह बँकिंग सेवा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत.

तसेच ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक समतोल साधत सहकार अधिक सक्षम करणे हेच आमचे ध्येय असून, सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेने ११०० कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा टप्पा गाठला आहे. पुढील काळातही समता पतसंस्था समाजाभिमुख उपक्रम राबवत आर्थिक स्वावलंबनाचा संदेश देत राहील.

या प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल, संचालक कचरू मोकळ, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, श्वेता अजमेरे, सुहासिनी कोयटे, भरत अजमेरे, ज्योत्स्ना पटेल, उमेश वाळेकर, प्रमोद लोणगावकर, रवी शिंगणापुरे, ज्ञानेश्वर काळे, सुदर्शन साळुंखे, समता पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांच्यासह छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक हितचिंतक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुंडलिक नगर शाखेचे शाखाधिकारी गणेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



