समताच्या शिर्डी शाखेच्या ठेवीत तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढ
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या शिर्डी शाखेच्या ठेवीत तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढ
कोपरगाव : महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या १६ शाखा आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शाखेत ठेवी,कर्ज, सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये लक्षणीय वाढ झाली असून शिर्डीतील सर्वच वयोगटातील सभासदांना समताच्या योजना आणि उपक्रमांची माहिती करून देत संस्थेची मूल्ये आणि दृष्टीकोनांप्रमाणे अविरतपणे सेवा देण्याचे काम करत आहे. शिर्डी शाखेची स्थापना ११ मे १९९८ रोजी करण्यात आली.आज शिर्डी शाखेला २४ वर्ष पूर्ण झाली असून वर्षानुवर्ष या शाखेची आर्थिक घोडदौड सुरु आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेर शिर्डी शाखेच्या ठेवी २१ कोटी ४९ लाख इतक्या झाल्या असून ठेवींमध्ये वार्षिक सरासरीने तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गत ६ महिन्यात शिर्डी शाखेच्या ठेवींमध्ये ४ कोटी २१ लाख रुपये इतकी वाढ झाली आहे.एकूण कर्ज वाटप ७ कोटी ४१ लाख रुपये केले आहे. सुरक्षित सोनेतारण कर्जामध्ये देखील शिर्डी शाखेने विशेष उच्चांक गाठला असून ६ कोटी २५ लाख रुपयांचे सोनेतारण कर्जाचे वाटप केले असल्याची माहिती शिर्डी शाखेचे शाखाधिकारी श्री.सतीश जेजुरकर यांनी दिली.
शाखेतील अत्याधुनिक सुविधांविषयी अधिक माहिती देताना शाखेचे सोनेतारण अधिकारी सौ.सायली कापरे म्हणाल्या की, शिर्डी शाखेद्वारा जेष्ठ नागरिकांना घरपोहोच पेन्शन सुविधा, लाॅकर सुविधा, मोबाईल बॅकींग, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी., आय.एम.पी.एस.,क्यु. आर.कोड सुविधा, व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली, एस.एम.एस.यांसारख्या विविध सुविधा आणि योजना ग्राहक,सभासदांना देण्यात येत आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तींना पत निर्माण करून देत त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना ११ मे १९८६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी करण्यात आली.त्यानंतर बदलत्या काळानुसार समताच्या १६ शाखांच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभासद हित जोपासत अविरतपणे सेवा देण्याचे काम केले जात आहे.
शिर्डी शाखेच्या या आर्थिक घोडदौडीमध्ये समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक श्री.गुलाबचंद अग्रवाल, श्री.जितूभाई शहा, श्री. अरविंद पटेल, श्री.चांगदेव शिरोडे, श्री.कचरू मोकळ, श्री.रामचंद्र बागरेचा, श्री.संदीप कोयटे, श्री. गुलशन होडे, श्री.निरव रावलिया, संचालिका सौ.शोभा दरक,जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शाखेचे शाखाधिकारी श्री.सतीश जेजुरकर, सोने तारण अधिकारी सौ.सायली कापरे, सौ.कांचन दंडवते, श्री. शशिकांत सोनवणे आणि कर्मचारी यांचा विशेष सहभाग आहे.