समताच्या आर्थिक प्रगतीमध्ये सोने मुल्यांकारांचा सहभाग महत्त्वाचा – श्री फत्तेचंद रांका, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताच्या आर्थिक प्रगतीमध्ये सोने मुल्यांकारांचा सहभाग महत्त्वाचा – श्री.फत्तेचंद रांका,अध्यक्ष
कोपरगाव : सोनेतारणाचा व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रात अनेक पतसंस्था असून अनेक पतसंस्था या कर्ज प्रकाराच्या माध्यमातून भक्कम स्थितीत उभ्या आहेत. समता पतसंस्था देखील सोनेतारण कर्ज प्रकारात अव्वल आहे.परदेशातील कंपन्यांसोबत समता स्पर्धा करत आहे.या स्पर्धेत समतातील प्रत्येक सोने मुल्यांकार हा समता सोबत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करावे आणि स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रयत्न करावा.त्यामुळे समताच्या आर्थिक प्रगतीमध्ये सोने मूल्यांकराचा सहभाग महत्त्वाचा आहे.असे प्रतिपादन सुवर्ण मुल्यांकर मेळाव्याचे प्रमुख पाहुणे श्री. फत्तेचंद रांका यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात सोनेतारण विभागाच्या वतीने सोने मुल्यांकन करणाऱ्या मुल्यांकरांसाठी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी भव्य स्वरूपात मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष श्री.फत्तेचंद रांका कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तर कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष श्री.योगेश बागुल, खुबानी ज्वेलर्स चे संस्थापक श्री.तुलसीदास खुबानी यांची प्रमुख उपस्थिती होती.समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे आणि प्रमुख उपस्थितांचे स्वागत समता पतसंस्थेचे संचालक श्री संदीप कोयटे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार काका कोयटे यांनी केला तर श्री.योगेश बागुल यांच्या सत्कार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी केला. समता पतसंस्थेचे बिझनेस फॅसिलिटर श्री.विवेक नगरकर यांच्या हस्ते श्री.तुलसीदास खुबानी यांचा सत्कार करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले की, सोनेतारण हा पतसंस्था चळवळीतील पतसंस्थांमध्ये अतिशय सुरक्षित कर्ज प्रकार म्हणून ओळखला जातो. कर्ज प्रकाराच्या माध्यमातून समता पतसंस्था अतिशय भक्कम स्थितीत उभी असून सोनेतारणामध्ये वेगवेगळे उच्चांक गाठत आहे. मुल्यांकारामुळेच समताने आज २०० कोटींच्या पुढे सोनेतारणाचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे समताचा सोने मुल्यांकन करणारा मुल्यांकार हा समता आणि ग्राहक यामधील दुवा समजला जात आहे.समता पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर सोने मुल्यांकार देखील आत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा ग्राहक सभासदांना त्वरित सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
मेळाव्यात उपस्थित असलेल्या मुल्यांकारांशी संस्थेचे संचालक श्री. संदीप कोयटे यांनी सोनेतारण कर्ज आणि त्याविषयी येणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.तसेच समताच्या सोने मुल्यांकारास प्रत्येक वर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समताच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. मुल्यांकारांची सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने देखील समता विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रमुख उपस्थितांपैकी मनोगत व्यक्त करताना श्री.योगेश बागुल म्हणाले की, समताच्या माध्यमातून काकांनी आपल्याला आपल्यातील चाणक्षपणा दाखविण्याची खुप मोठी संधी दिलेली आहे. सर्वसामान्यांना आधार आणि पाठबळ देण्याची वृत्ती कोपरगावातील कोयटे परिवारात आहे. कोपरगाव तालुका सुवर्णकार असोसिएशनचा पदाधिकारी आणि मुल्यांकार हा सदैव तुमच्या साठी कधीही उभा राहील. आम्हाला मुल्यांकन करण्याची संधी दिली. आम्ही त्या संधीचे सोने करून आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावू.
या मेळाव्याचे सुत्रसंचालन समता पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी समता पतसंस्थेच्या सोनेतारण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी मानले.