दै.सकाळचे जेष्ठ पत्रकार श्री.सतीश वैजापूरकर यांनी काका कोयटे यांच्या विषयी दिलेला लिखित स्वरूपातील अभिप्राय
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
काका कोयटेंनी कै.कोल्हे साहेबांची भविष्यवाणी खरी ठरवीली…
शेती आणि सहकारी साखर कारखानदारीतील तज्ञ माजी मंत्री कै.शंकरराव कोल्हे साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात कोपरगावचे सन्मा.काका कोयटे यांच्याबाबत भविष्यवाणी केली.
काका, जगात नाव कमावतील हि ती वीस वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी होती.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने हि भविष्यवाणी सार्थ ठरवीली.
छत्तीस देशांचा समावेश असलेल्या एशियन क्रेडीट युनियनच्या खजिनदारपदी त्यांची निवड झाली.
त्यासाठी त्यांनी बॅकांकला जाऊन आपल्या पतसंस्था चळवळीतील योगदानाची आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या समता पतसंस्थेतील नव्या टेक्नाॅलाजी वापराबाबतची सविस्तर माहीती विवीध देशातील प्रतिनीधीं समोर सादर केली.
हि निवड जाहिर झाल्यानंतर त्यांनी व्यासपिठावर जाऊन आपला तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेऊन भारताची शान वाढवीली.
राष्ट्रध्वज हाती घेतलेला त्यांचा फोटो, पहाणा-याला उर्जा देऊन जातो….
कै. कोल्हे साहेबांना माणसांची पारख होती.
त्याबाबतीत ते रत्नपारखी होते…
त्यांनी हि भविष्यवाणी केली त्यावेळी काका राज्यातील पतसंस्था चळवळीचा डंका जागतिक व्यासपिठावर वाजवतील याची कुणी कल्पना देखील केली नसती.
काकांचे पतसंस्था चळवळीतील योगदान मोलाचे…
केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगरला पहिली सहकार परिषद घेतली.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीतील निवासस्थानी त्यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले.
सहकारी पतसंस्था चळवळीबाबत अधिकारवाणीने बोलणारे आणि महानुभवां सोबत कसे बोलावे याची जाण असणारे काका या मेजवानीत विशेष निमंत्रीत होते.
राज्यातील पतसंस्था चळवळीला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचे योगदान मोलाचे.
त्यांची एशियन क्रेडीट युनियनच्या खजिनदारपदी निवड झाली.
आज सकाळ ने त्यांची विशेष मुलाखत प्रसिध्द केली.
आपला महाराष्ट्र, पतसंस्था चळवळीत देशात अव्वल.
सव्वा दोन कोटी सभासद, १ लाख १० हजार कोटी रूपयांच्या ठेवी.
बहात्तर हजार कोटी रूपयांचे कर्जवाटप.
दोन लाख दैनंदिन ठेव प्रतिनीधींचा दररोजचा एक कोटी कुटूंबियां समावेत संपर्क.
महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीचे स्वरूप हे असे विशाल आहे.
काकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या आधारे, या चळवळीचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर या नात्याने,
कोपरगाव, महाराष्ट्र आणि भारताचे नाव जागतिकस्तरावर नेले.
कै.शंकरराव कोल्हे साहेबांची भविष्यवाणी सार्थ ठरवीली.
काकांच्या कार्यकर्तृत्वास सलाम…
त्यांच्या यापुढील वाटचालीस शुभेच्छा….
एशियन क्रेडीट युनियनचे खजिनदार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष
सन्मा.काका कोयटे यांचा मोबाईल क्रमांक ः- ९३७१३३३५५५
शुभेच्छुक
सतीश वैजापूरकर, पत्रकार, दै.सकाळ शिर्डी – राहाता ता. ८|१०|२२