गुळाचे व्यापारी कांतीलाल जोशी यांची एक मताने समताच्या संचालक पदी निवड – श्री. गुलाबचंद अग्रवाल, ज्येष्ठ संचालक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

गुळाचे व्यापारी कांतीलाल जोशी यांची एक मताने समताच्या संचालक पदी निवड – गुलाबचंद अग्रवाल, ज्येष्ठ संचालक

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळात कोपरगाव तालुक्यातील प्रतिष्ठित गुळाचे व्यापारी श्री.कांतीलाल हरलाल जोशी यांची एक मताने निवड करण्यात आली. गुळाच्या व्यापारामुळे त्यांची भारतभर भ्रमंती असते.त्यांचा अनुभव आणि व्यापाराच्या अनुषंगाने भारतभर भ्रमंती समता पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्वाची ठरणार आहे. समता पतसंस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत समता परिवाराला मोलाचे सहकार्य जोशी परीवारातील सदस्य करत आले आहेत.अशी माहिती समता पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल यांनी एक मताने निवड झाल्या प्रसंगी दिली.

पुढे म्हणाले की, कोरोना काळात समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक कै.मोहनलाल आनंदराम झंवर यांचे कोरोनाने निधन झाल्यामुळे संचालक मंडळातील पद रिक्त झाले होते. त्यांच्यासारख्याच व्यक्तिमत्त्वाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे.समता पतसंस्थेच्या ९ मे १९८६ रोजी झालेल्या पहिल्या ठराव बैठकीचे अध्यक्ष पदसुद्धा त्यांनी भूषविलेले आहे. समताच्या प्रत्येक उपक्रमातही ते नेहमी उपस्थित राहत असल्यामुळे आम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा नव्याने संचालक झाल्याने अधिक होणार आहे.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जेष्ठ संचालक श्री.गुलाबचंद अग्रवाल, श्री.अरविंद पटेल, श्री.जितुभाई शहा, श्री.रामचंद्र बागरेचा, श्री.चांगदेव शिरोडे, श्री.संदीप कोयटे, श्री.गुलशन होडे, श्री.कचरू मोकळ यांची उपस्थिती होती. एक मताने निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आणि संचालकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



