समता पतसंस्थेचे परप्रांतातील पतसंस्थांनाही आकर्षण – विजय क्रिष्णन, चेअरमन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता पतसंस्थेचे परप्रांतातील पतसंस्थांनाही आकर्षण – विजय क्रिष्णन, चेअरमन
तमिळनाडू जिल्ह्यातील मदुराई येथील एस.एम.सी. को – ऑप हाऊस बिल्डिंग सोसायटी पदाधिकाऱ्यांसोबत संस्थेचे अधिकारी.
कोपरगाव : महाराष्ट्रात पतसंस्था चळवळीची पाळेमुळे मजबूत करून देशात आणि परदेशातही स्वतःच्या कार्याची आणि महाराष्ट्रातील अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी पतसंस्था म्हणून समताची ओळख काकांनी करून देत स्वतःच्या आणि समताच्या नावाचा ठसा उमटविलेला असून कौतुकास्पद आहे. समता पतसंस्था ही राज्यालाच नाही, तर आम्हालाही आदर्श आहे. त्यामुळे समता पतसंस्थेचे आकर्षण परप्रांतातील पतसंस्थांनाही आहे. असे गौरवोद्गार तमिळनाडू राज्यातील मदुराई येथील स्नेहा मल्टीस्टेट क्रेडिट (SMC) को-ऑप.हाऊस बिल्डिंग सोसायटीचे चेअरमन विजय क्रिष्णन यांनी काढले.
समता पतसंस्थेच्या व्हाउचरलेस बँकिंग प्रणाली विषयी माहिती घेताना एस.एम.सी. को – ऑप. हाऊस बिल्डिंग सोसायटीचे पदाधिकारी, अधिकारी.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास तमिळनाडू राज्यातील मदुराई येथील स्नेहा मल्टीस्टेट क्रेडिट (SMC) को-ऑप. हाऊस बिल्डिंग सोसायटीचे चेअरमन विजय क्रिष्णन, व्हा.चेअरमन शांतिनी, राज्य समन्वयक प्रसाद शिवलिंगम, विभागीय अधिकारी प्रभू रामदास, गुणा, मिल्टन प्रिन्स मधुराम, झोनल अधिकारी प्रवीण चंद्रण एम., सेक्रेटरी कार्तिकेयन एस., एच.आर मिरूथुभाषिनी के., असि.जनरल मॅनेजर जलगणेश एस., आणि नेटविन सॉफ्टवेअर कंपनीचे जनरल मॅनेजर अजित मेनन, नाशिक विभागीय अधिकारी वैभव बोरसे, नगर विभागीय अधिकारी मंदार पाटील आदींनी २४ जानेवारी २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली.
सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल काका कोयटे एस.एम.सी. को – ऑप. बिल्डिंग हाऊस सोसायटीचे चेअरमन विजय क्रिष्णन, व्हाईस चेअरमन शांतिनी सत्कार करताना. समवेत नेटविन सॉफ्टवेअरचे जनरल मॅनेजर श्री अजित मेनन.
समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणाऱ्या अत्याधुनिक बँकिंग प्रणालीविषयी ठेव प्रमुख संजय पारखे, ईडीपी प्रमुख योगेश आसने, अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला तर अधिकारी संजय पारखे, योगेश आसणे यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकारी,अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
समता पतसंस्थेविषयी माहिती देताना संस्थेचे अधिकारी.
समता पतसंस्थेविषयी मिळालेल्या माहितीबद्दल एस.एम.सी. हाऊस बिल्डिंग सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. समता पतसंस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, अधिकाऱ्यांचे सेक्रेटरी कार्तिकेयन एस यांनी आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.