ब्रेकिंग

महाराष्ट्र शासनाच्या एसटीत आणि समतात विश्वास व सुरक्षितता हे साम्य आहे – डी.वाय.एस.पी.श्री.संदीप मिटके

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

महाराष्ट्र शासनाच्या एसटीत आणि समतात विश्वास व सुरक्षितता हे साम्य आहे – डी.वाय.एस.पी.श्री.संदीप मिटके

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्धापन दिनानिमित्त स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत समता चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांचे सर्व उपक्रम कोपरगावकरांच्या विकासाला चालना देणारे असून स्तुत्यपूर्ण आहे.या लोकार्पण सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तसेच चालक व वाहकांमुळे एसटीतून प्रवास करण्याचा विश्वास आणि सुरक्षितता मिळाल्याने प्रवास सुखकर होतो. त्याचप्रमाणे समतावर ग्राहक , सभासदांचा विश्वास आणि समता त्यांना देत असलेली सुरक्षितता या दोन्हीतही साम्य असल्याचे गौरोद्गार शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी (डी वाय एस पी) श्री.संदीप मिटके यांनी कोपरगाव आगारात विविध उपक्रम लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले.

समता चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव तालुका व्यापरी महासंघ, किराणा मर्चंट्स असोसिएशन आणि कोपरगाव आगार यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सी.सी.टी.व्ही.सुरक्षा योजना , माणुसकीचे मंदिर ,जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र ,स्टोन गार्डन ,बस स्थानक सुशोभीकरण,एस जे एस हॉस्पिटलच्या सहकार्याने एस. टी. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी , लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आदि सेवांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्या प्रसंगी विविध उपक्रमांचे लोकार्पण प्रमुख पाहुणे श्री.संदीप मिटके यांच्या हस्ते सी.सी.टी.व्ही.सुरक्षा योजना ,जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ.रजनी गुजराथी यांच्या हस्ते माणुसकीचे मंदिर तर सेल्फी पॉईंटचे लोकार्पण सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे हस्ते करण्यात आले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.विवेक कोल्हे, गोदावरी दुध संघाचे चेअरमन श्री.राजेश परजणे, कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव देसले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या वेळी ते बोलत होते.

अतिशय उत्कृष्टपणे कोपरगाव बस स्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यकरण केले जात असल्यामुळे कोपरगाव बस स्थानकाचा अहमदनगर जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक येईल. सीसीटीव्हीमुळे कोपरगाव शहरातील तसेच बस स्थानकातील अपप्रवृत्तींना आळा बसणार आहे. माणुसकीच्या मंदिराच्या माध्यमातून गरजवंतांची गरज भागणार आहे. घरातील ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांसाठी विरंगुळा केंद्र , उद्यान आणि कोपरगाव आगाराच्या सुशोभीकरणात सेल्फी पॉईंट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच या सर्व सुविधा आणि उपक्रमांचा फायदा प्रवाशांना करून देण्याचे काम कोपरगाव आगारातील पदाधिकारी, अधिकारी, चालक , वाहकांची असून त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे  – काका कोयटे, अध्यक्ष, समता चॅरिटेबल ट्रस्ट

महाराष्ट्रात पहिल्यांदा कोपरगाव आगाराच्या वतीने ४२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब यांनी भूषविले. प्रास्ताविक समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.

ते म्हणाले की , एसटी ही महाराष्ट्राची जीवन रेखा आहे. सामान्य जनतेच्या जीवनात तिला अढळ स्थान आहे.तिला ७५ वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सवी वर्षात ती पदार्पण करत आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाने बस स्थानक स्वच्छता व सुशोभीकरण अभियानांतर्गत कोपरगाव आगारा द्वारा आवाहन केल्यानंतर समता चॅरिटेबल ट्रस्ट, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बस स्थानकात स्वच्छता मोहिमेबरोबरच विविध सुविधा आणि उपक्रम राबविण्याचे ठरवत आज त्या सुविधा आणि उपक्रमांचे लोकार्पण झाले आहे.तसेच अशाच प्रकारच्या कोपरगाव आगारातील सुशोभीकरणासाठी कोपरगावातील इतर सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा.

अतिशय उत्कृष्टपणे कोपरगाव बस स्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यकरण केले जात असल्यामुळे कोपरगाव बस स्थानकाचा अहमदनगर जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक येईल. सीसीटीव्हीमुळे कोपरगाव शहरातील तसेच बस स्थानकातील अपप्रवृत्तींना आळा बसणार आहे. माणुसकीच्या मंदिराच्या माध्यमातून गरजवंतांची गरज भागणार आहे. घरातील ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांसाठी विरंगुळा केंद्र , उद्यान आणि कोपरगाव आगाराच्या सुशोभीकरणात सेल्फी पॉईंट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तसेच या सर्व सुविधा आणि उपक्रमांचा फायदा प्रवाशांना करून देण्याचे काम कोपरगाव आगारातील पदाधिकारी, अधिकारी, चालक , वाहकांची असून त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे.

कोपरगाव बसस्थानकात स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी विविध उपक्रमांचे लोकार्पण हे कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.काका कोयटे यांच्या पुढाकारातून या सर्व उपक्रमांचे लोकार्पण हे सामाजिक कार्यात आम्हा तरुणांना दिशा देणारे असून आमच्यासमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. तसेच स्व.शंकरराव कोल्हे परिवहन मंत्री असताना त्यांनी बसमध्ये महिलांना बसण्यासाठी राखीव जागांची तरतूद केली होती. कोपरगाव बसस्थानकाची स्वच्छता आणि सुशोभीकरण अभियानात संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने उर्वरित जागेचे सुशोभीकरण करू. चालक व वाहकांसाठी निवासी व्यवस्था करून देऊ.असे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष श्री.विवेक कोल्हे यांनी जाहीर केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. राजकुमार बंब म्हणाले की , लाल परी ही पहिल्यांदा अहमदनगर – पुणे या मार्गावर धावली. त्या वेळेस तिचे नाव निल कमल असे होते. बसच्या चालक, वाहकांनी प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन लाल परी ची ओळख सुवर्ण परी या नावाने करावी. प्रत्येक चालक, वाहक हा व्यसनाधीन नसून व्यसनमुक्त असला पाहिजे.यामुळे लाल परीला अजून चांगले दिवस येऊन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील प्रथम क्रमांकाचे मंडळ म्हणून ओळखले जाईल.

या वेळी समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे, आगार प्रमुख श्री.अमोल बनकर, आगार वाहतूक नियंत्रण अधिकारी श्री.अविनाश गायकवाड, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे ,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष श्री. विजय बंब, जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ.रजनी गुजराथी, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनचे अध्यक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख श्री.कैलास जाधव, माजी शिवसेना शहर प्रमुख श्री.भरत मोरे, श्री.गगन हाडा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.सुनिल गंगुले, माजी नगरसेवक श्री.मंदार पहाडे, व्यापारी श्री.कांतीलाल जोशी , श्री.चांगदेव शिरोडे, श्री.अरविंद पटेल, श्री.अजित लोहाडे, श्री.तुलसीदास खुबानी, श्री.नारायण अग्रवाल, श्री.गुलशन होडे, श्री.केशव भवर, श्री.किरण बिडवे, श्री.संदीप कोयटे, श्री.दिपक अग्रवाल, श्री.सचिन भट्टड, श्री.प्रदीप साखरे, श्री.भाऊसाहेब पोटभरे, श्री.विष्णुपंत गायकवाड, श्री.हर्षल जोशी आदिंसह समता चॅरीटेबल ट्रस्ट, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, सदस्य, समता परिवार व कोपरगाव आगार पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, शहरातील जेष्ठ, श्रेष्ठ, विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर आजी, माजी पदाधिकारी, प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपरगाव आगाराच्यावतीने सुशोभीकरण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल व्यापारी महासंघ धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष श्री.गुलशन होडे, श्री. दिपक अग्रवाल, श्री.विजय घाडगे, श्री.संदीप केकाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.सुधीर डागा यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे