ब्रेकिंग

समता पतसंस्थेची संगमनेर शाखा ग्राहकांना सेवा देण्यात महाराष्ट्रात अग्रेसर – श्री.सोमनाथ कळसकर, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेची संगमनेर शाखा ग्राहकांना सेवा देण्यात महाराष्ट्रात अग्रेसर – श्री.सोमनाथ कळसकर , अध्यक्ष

कोपरगाव : संगमनेर तालुक्यात अनेक राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका आहेत. यातील बोटावर मोजण्या इतक्याच बँका आम्हा जेष्ठांना सेवा देत असतात.त्यात समता पतसंस्थेच्या संगमनेर शाखा ही ग्राहकांना सेवा देण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. यामुळे संगमनेर शहराच्या लौकिकात भर पडली असून संगमनेर शाखेचे अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत असल्याने जेष्ठ नागरिकांबाबत समता पतसंस्थेचे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार संगमनेर तालुका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.सोमनाथ कळसकर यांनी काढले.

समता पतसंस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.गणेशलाल बाहेती होते.

संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.सोमनाथ कळसकर, जेष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.रत्नाकर पगारे, महेश जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.गणेशलाल बाहेती यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन काका कोयटे, जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच महाराष्ट्रात नेतृत्व आणि कर्तृत्ववाने पतसंस्था बळकट करून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बिनविरोध अध्यक्ष पदी विराजमान झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांचा सत्कार संगमनेर तालुका जेष्ठ नागरिक संघ, जेष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था, महेश जेष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने संयुक्तपणे करण्यात आला.

संस्थेचे जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी चित्रफितीद्वारा समता लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम आणि सभासदांसाठी असणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती दिली. असता श्री.रविंद्र बोरकर म्हणाले की, समता पतसंस्थेचा आर्थिक प्रगतीचा आलेख पाहून आम्ही अतिशय प्रभावीत झालो आहोत.समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत संस्थेच्या एकूण ९०२४४ सभासदांपैकी ९९.६९ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण असल्याचे पाहून आमचा संस्थेवरील विश्वास अधिक वाढला आहे. तसेच अनेक जेष्ठ नागरिकांनी ही मनोगत व्यक्त करत संगमनेर शाखेच्या वतीने देण्यात येत असलेल्या सेवेचे कौतुक करत शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. समताची कामकाजाची पद्धत आणि आम्हाला देत असलेल्या सेवेबद्दल आमचा संस्थेवरील विश्वास द्विगुणित होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेचे मुख्य कार्यालय कोपरगाव या ठिकाणी असले, तरी समता पतसंस्था सुरू करण्यात संगमनेर शहरातील पतसंस्था चळवळीत काम करणाऱ्या अनेक व्यक्तींचा मोलाचा वाटा आहे. समताने लहान मुलांपासून ते जेष्ठ, श्रेष्ठ सभासदांसाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवत आहे. २ फेब्रुवारी २०२३ पासून संगमनेर शहरात सुरू करण्यात आलेल्या समताच्या शाखेद्वारा संगमनेरकरांना सेवा देत आहोत.या शाखेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील अनेक नवीन सभासद जोडले गेले असून यापुढे ही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पैशांना सुरक्षितता देण्याची संधी द्यावी.तसेच अजून तुमच्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम आम्ही संगमनेरमध्ये घेऊन येणार आहोत.

या मेळाव्याला संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.सोमनाथ कळसकर, जेष्ठ नागरिक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.रत्नाकर पगारे, महेश जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.गणेशलाल बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री.देवराज गांधी श्री.सयाजी कोते, श्री.एकनाथ गुंजाळ, श्री.दत्तात्रय माने, श्री.संपत जाधव, श्री.सुभाष बडकस, श्री.बद्रीनारायण डागा, श्री.संजय पाबळकर, श्री.नारायण बोहुळ, सौ.उषा पवार, श्री.रवींद्र बोरकर, श्री. बबन मोरे, श्री.भाऊसाहेब हंडे, श्री. अब्दुल शेख, श्री.प्रभाकर कोकाटे, श्री.गणपतराव टिळे, श्री.यादव कानवडे, श्री.काशिनाथ डोंगरे, श्री. संजय साबळे, श्री.राधेश्याम कोल्हे, श्री.विकास वनपत्रे, सौ.अर्चना वनपत्रे आदीं सह जेष्ठ नागरिक, सभासद तसेच संगमनेर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ, कल्याणकारी जेष्ठ नागरिक संघ, महेश ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य कार्यालयाचे इडीपी विभागाचे श्री. योगेश आसने, श्री.संजय गीते, श्री. धनंजय माशेरे , कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयाचे श्री.संजय पारखे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संगमनेर शाखा वरिष्ठ अधिकारी सौ.प्रविणी मोरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे