हृदयरोग, मधुमेह आजार नाही, तर चुकीच्या जीवन शैलीचा परिणाम – डॉ.मिलिंद सरदार
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
हृदयरोग, मधुमेह आजार नाही, तर चुकीच्या जीवन शैलीचा परिणाम – डॉ.मिलिंद सरदार
कोपरगाव : ॲलिओपॅथी गोळी आयुष्यभर घेण्यासाठी बनवलेली नाही. त्या गोळ्या घेत असताना आहार, विहार आणि विचारात बदल करून सुदृढ आणि आनंदी जीवन जगता येते. तसेच मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब हे आजार नाही, तर आपण आपल्या शरीराला स्वतःहून लावलेले आजार आहे. त्यामुळे उतरत्या वयामध्ये शरीराला जडलेल्या व्याधी या फक्त आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. सकारात्मक विचार आणि मानसिकता बदलून उर्वरित आयुष्य जगणे ही एक ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन समता चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते डॉ.मिलिंद सरदार यांनी केले.
समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि माधवबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हृदयरोग, मधुमेह : समज आणि गैरसमज’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यानमालेचे आयोजन स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख व्याख्याते डॉ.मिलिंद सरदार, डॉ.प्रशांत याकुंडी, समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक श्री.कांतीलाल जोशी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. डॉ.मिलिंद सरदार, डॉ.प्रशांत याकुंडी यांचा सत्कार समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते तर डॉ.अनंत नेरलकर यांचा सत्कार श्री.रमेश भन्साळी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे श्री.संजय पारखे यांनी करून दिला.कोपरगाव शहरातील श्री.संभाजी नाईक यांनी मनोगतातून माधवबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून बायपास सर्जरी न करता माधवबागने केलेल्या प्रक्रिये द्वारा बायपास सर्जरी ला बाय पास केले असल्याचे सांगितले.
सरदार पुढे म्हणाले की, अहंकार हे सगळ्या आजाराचे मूळ कारण असून ९० टक्के पेक्षा अधिक आजार यामुळे होत असतात. हे सर्व आजार कमी करायचे असल्यास अहंकार, प्रेम, स्पर्धा आणि तुलना, माफी मागणे आणि माफ करणे, प्राणायम, ओमकार उच्चारणे आणि ध्यान या सात पैलुंबाबत सकारात्मक विचार आपल्या आयुष्यात आणणे गरजेचे आहे.तसेच तुम्हाला हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबेटिस , उच्च रक्तदाब असे आजार असतील किंवा तुमच्या मनात हार्ट अटॅक येण्याविषयीची भिती असेल तर माधवबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा उत्तम पर्याय असून कमी खर्चात या आजारावर मात केली जाऊ शकते.
पंचसुत्री विषयी अधिक माहिती देताना डॉ.प्रशांत याकुंडी म्हणाले , सुदृढ व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली पंचसुत्री आहे. पंचसुत्रीत पंचकर्म, आहार, निदान, ताण तणाव नियोजन आणि उर्वरित आयुष्यातील १०० टक्के सर्व गोळ्या बंद करणे यावर योग्य ते उपाय करून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारखे आजार मुळापासून नष्ट होत आहेत. माधवबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याबाबत योग्य मार्गदर्शन आम्ही करत असून मोठ्या प्रमाणात डायबिटीज, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या व्याधी असलेल्या व्यक्ती पूर्णपणे तंदुरुस्त झालेल्या आहेत.
या वेळी माधवबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.अनंत नेरलकर , डॉ. कल्पिता वालझडे (संगमनेर), डॉ. भावना सोमाणी (श्रीरामपूर) , समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक श्री.कांतीलाल जोशी, श्री.गुलशन होडे, जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे , श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, श्री.संभाजी नाईक तसेच कोपरगाव शहरातील नागरिक, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे सुत्रसंचालन समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे श्री.संजय पारखे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार यांनी मानले.