कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली विविध योगासनांची प्रात्यक्षिके
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोयटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली विविध योगासनांची प्रात्यक्षिके
कोपरगाव : समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित शहरातील निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात इ.१ ली ते इ.५ वी च्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत विविध योगासनांच्या प्रकारांचे प्राथमिक प्रात्यक्षिके करून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निवारा परिसरात विद्यार्थ्यांवर संस्कार करणाऱ्या शिक्षकांच्या सोसायट्या अधिक आहे. त्यामुळे १९९६ साली या परिसरात विद्यालयाची स्थापना करून परिसरातील मुलांना कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने या विद्यालयची स्थापना करण्यात आली आणि आज या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेत आहे.त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक शिक्षणाकडेही लक्ष दिले जाते.
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून या दिवशी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा करून योगासनाचे शारीरिक फायदे सांगितले जातात.निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात ही विद्यार्थ्यांसमवेत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करताना विद्यार्थ्यांना शीर्षासन, वृक्षासन, मयुरासन, व्याघ्रासन, हनुमानासन, पूर्णचक्रासन या विविध प्रकारांची माहिती सौ.तृप्ती कासार आणि सौ.छाया ओस्तवाल यांनी सांगताना प्रत्यक्षात प्रात्यक्षिके ही करून दाखवली.
निवारा परिसरात विद्यार्थ्यांवर संस्कार करणाऱ्या शिक्षकांच्या सोसायट्या अधिक आहे. त्यामुळे १९९६ साली या परिसरात विद्यालयाची स्थापना करून परिसरातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने या विद्यालयाची स्थापना करण्यात आली आणि आज या विद्यालयातून अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेत आहे.त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक शिक्षणाकडेही लक्ष दिले जाते.
स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रमुख सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे, सदस्या सौ.मीनाताई व्यास, सौ. जोत्सनाभाभी पटेल, सौ.सुनंदाताई भट्टड, श्री.सुरेंद्र व्यास, श्री.रंगनाथ खानापुरे, श्री.संतोष मुदबखे यांच्या मार्गदर्शनाखाली या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योगासनांची प्रात्यक्षिके करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात सौ.आशा मोकळ, सौ.मनिषा कांबळे आणि सौ.स्वप्नाली महिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी ही विद्यार्थ्यांसह प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते. बाल वयातच विद्यार्थ्यांनी अप्रतिम स्वरूपाच्या केलेल्या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थित निवारा परिसरातील नागरिक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आयोजन समितीचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ यांनी मानले.