कोपरगावातील विविध संस्थांच्यावतीने नवनियुक्त पी.आय.प्रदीप देशमुख यांचा सन्मान
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगावातील विविध संस्थांच्यावतीने नवनियुक्त पी.आय. प्रदीप देशमुख यांचा सन्मान
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने नवनियुक्त पी.आय. प्रदीप देशमुख यांचा सत्कार करताना संस्थेचे चेअरमन काका कोयटे, संचालक कांतीलाल जोशी, गुलशन होड व इतर मान्यवर.
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे. कोपरगावचा व्यापारी, छोटे – मोठे व्यावसायिकांना सुरक्षितता देऊन कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देण्याचा मानस आहे. विशेषतः त्यासाठी कोपरगाव शहरात प्रत्येक दुकानात सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असून त्याचे नियंत्रण शहर पोलीस स्टेशनमध्ये असणार आहे. वाहतूक विभागामार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन शहरातील ट्रॅफिक कमी करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देणार आहे. तसेच कोपरगावातील दहशत कमी करून व्यापारी, छोटे – मोठे व्यवसायिकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या संकल्पना राबविणार आहे.असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले.
समता पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचा समता नागरी सहकारी पतसंस्था ,कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ या संस्थांच्या वतीने सत्कार करून सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी किराणा दुकानदारांच्या आणि व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या मनोगतातून मांडल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी भूषविले.
कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मान करताना व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, समवेत अध्यक्ष काका कोयटे, सचिव प्रदीप साखरे व इतर सदस्य.
देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात समता नागरी सहकारी पतसंस्थेने आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आधुनिक तंत्रज्ञान व ग्राहकांना तत्पर सेवा यात समताचा नावलौकिक आहे.
तसेच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले की, कोपरगाव शहरातील सध्याचे वातावरण पाहता पोलीस यंत्रणेने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या संकल्पना कोपरगाव शहरातील शांतता आणि व्यापारी, किराणा दुकानदार यांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. त्या अमलात आणण्यासाठी समता परिवार, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन नेहमी सहकार्य करेल.
कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने नवनियुक्त पी.आय प्रदीप देशमुख यांच्या सत्कार करताना अध्यक्ष राजकुमार बंब. समवेत संस्थापक काका कोयटे व इतर मान्यवर.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी केले. यावेळी व्यापारी महासंघाच्या धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष गुलशन होडे, गुळाचे प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल जोशी, व्यापारी किरण शिरोडे, महावीर सोनी, वारी येथील सिमेंटचे प्रसिध्द व्यापारी नरेंद्र ललवानी , हर्षल जोशी तसेच समता पतसंस्थेचे अधिकारी, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे आभार धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष गुलशन होडे यांनी मानले.