यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यातील पतसंस्था व मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांची समतास सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
यवमाळ आणि सांगली जिल्ह्यातील पतसंस्था व मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांची समतास सदिच्छा भेट
यवतमाळ आणि सांगली जिल्ह्यातील पतसंस्था व मल्टिस्टेट च्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली असता समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे आणि सुधनचे चेअरमन संदीप कोयटे उपस्थितांचा सत्कार करताना.
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास २ सप्टेंबर २०२३ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देविदास काळे, व्हा.चेअरमन विवेकानंद मांडवकर, संचालक परीक्षित एकरे, घनश्याम निखाडे, उदय रायपुरे आणि सांगली जिल्ह्यातील पलूस येथील जनसेवा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी संस्थापक व शरद मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी तासगावचे चेअरमन संदीप आनंदराव माळी, एमडी कन्नम माळी, जनसेवा अर्बनचे व्यवस्थापक रविंद्र माने आदि पदाधिकारी,अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्याशी समताचे तंत्रज्ञान आणि सहकाराविषयी आणि सुधनचे चेअरमन संदीप कोयटे यांच्याशी सुधन प्रक्रियेविषयी चर्चा केली. त्या नंतर समता पतसंस्थेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग या पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक बँकिंग प्रणाली आणि संस्थेचे चेअमन काका कोयटे, ठेव विभागाचे संजय पारखे आणि सुधन प्रक्रिये विषयी सुधनचे चेअरमन संदीप कोयटे यांनी सविस्तर माहिती दिली.
समता पतसंस्था आणि सुधनचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या योजना, उपक्रमांविषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समता पतसंस्था व सुधनचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.