समतातील राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप…
कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूल आयोजित राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना पुणे येथील सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूल व नाशिक केंब्रिज स्कूलमध्ये झाला. यात पुणे येथील सेंट्रल स्कूलने नासिक येथील केंब्रिज स्कूलचा ३ – ० ने पराभव करत राज्य स्तरीय करंडकावर ठसा उमटविला. या स्पर्धेत गोल्डन बुटाचा मानकरी सेंट्रल स्कूलचा जॉन विनोद हा ठरला तर याच संघाचा तनय बोंडे याला उत्कृष्ट किपर होण्याचा बहुमान मिळाला.
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक देताना समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे व इतर मान्यवर.
या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, सीबीएसई पुणे विभागाचे निरीक्षक गिरीश टोकसे यांच्या उपस्थितीत विजेते व उपविजेत्यांना करंडक व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध प्रकारची भरघोस बक्षीस देऊन करण्यात आले. स्पर्धेत प्रामुख्याने महाराष्ट्र व गोवा राज्यातील ९२ संघातील १२०० स्पर्धकांनी सहभाग नोदविला होता.स्पर्धेचे उद्घाटन धर्मादाय सह आयुक्त एस.एम. बुक्के, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक सुविधा कडलग यांच्या हस्ते करण्यात आले होते.
प्रसंगी उत्कृष्ट गोल किपर म्हणून बहुमान मिळालेला तनय बोंडे मनोगत व्यक्त करताना म्हणाला की, समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेली ही स्पर्धा आणि देशात इतर ठिकाणी आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये खूपच फरक होता. या ठिकाणी खेळायला आल्यानंतर मिळालेल्या सुविधा राष्ट्रीय पातळीवर मिळत नाही.
उत्कृष्ट गोल किपरचा बहुमान मिळालेल्या तनय बोंडे सोबत मान्यवर.
तर गोल्डन बुट पटकाविलेला जॉन विनोद म्हणाला की, स्पर्धेच्या तीन ही दिवस समताच्या आस्वाद मेस विभागात नाश्ता, जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट होती. या मेसमध्ये मिळालेले जेवण हे अतिशय रुचकर होते.आमच्या घरी बनविलेल्या जेवणालाही अशी चव नसते. असे म्हणताच उपस्थित स्पर्धकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्याला दाद देत मिळालेल्या रुचकर जेवणाचे कौतुक केले.
उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गोल्डन बूट चे पारितोषिक मिळाल्या बद्दल जॉन विनोदचा सत्कार करताना संस्थेचे संस्थापक काका कोयटे व इतर मान्यवर
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक इसाक पठाण आणि इ.१० वीतील विद्यार्थिनी नक्षत्रा जपे व वृष्टी कोठारी यांनी केले. स्पर्धेतील पंच, विविध संघांचे प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे क्रिडा शिक्षक रोहीत महाले, सह शिक्षक शुभम औताडे, इम्रान शेख, अनिल नेमाने, अजिंक्य बोबडे, नम्रता निंबाळकर, वाहतूक विभाग प्रमुख विजय घाडगे व कर्मचारी ‘आस्वाद’ मेस विभाग इन्चार्ज तेजस्विनी नागरे व कर्मचारी आणि वसतिगृह विभाग प्रमुख प्रशांत मोरे व कर्मचारी तसेच इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे, सीबीएसई पुणे विभागाचे निरीक्षक गिरीश टोकसे, आस्वाद मेस विभागाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, प्राचार्या सौ.हर्शलता शर्मा, महाराष्ट्र व गोवा राज्यातील संघ, संघाचे प्रशिक्षक, क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षिका जलीश शाद यांनी मानले.