देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड – संदीप कोयटे, संचालक

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड – संदीप कोयटे, संचालक

कोपरगाव : नॅशनल को – ऑप. क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ कोरियाच्यावतीने २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड झाली असून कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

संचालक संदीप कोयटे यांचे छायाचित्र.

पुढे म्हणाले की, कोरिया देशातील सहकारी पतसंस्था चळवळ सर्वात प्रगत, शिस्तबद्ध व सुदृढ समजली जाते. भारतातील सरव्यवस्थापकांपैकी एकमेव निवड मुलाखतीतून करण्यात झाली आहे. भट्टड यांनी समता पतसंस्थेत क्लार्क पासून ते सरव्यवस्थापक पदापर्यंत स्वकर्तृत्वाने मजल मारली असून गेल्या २५ वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून ग्राहक, सभासदांना प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्यांनी २०१५ मध्ये सरव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्थेच्या ठेवी २७४ कोटी ७५ लाख इतक्या होत्या, आज २०२३ अखेरीस ८८१ कोटी ७३ लाख इतक्या झाल्या आहेत. समताला भेटी देण्यासाठी येत असलेल्या विविध भागातील पतसंस्था देखील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत असतात. त्यांची बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते.

कोरियातील सेऊल येथील मेरियट हॉटेलमध्ये ६ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातून मुलाखतीत सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे सचिन भट्टड यांची या प्रशिक्षणासाठी कोरियातील निवास व प्रवास खर्च कोरियन फेडरेशन करणार असल्याचे कोरियन फेडरेशनचे अध्यक्ष व असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे अध्यक्ष योन्सिक किम यांनी कळविले आहे.

सचिन भट्टड यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, फेडरेशनचे संचालक, पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदन होत असून समता पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, कांतीलाल जोशी, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, जितूभाई शहा, गुलशन होडे, निरव रावलिया, कचरू मोकळ, संचालिका सौ.शोभा दरक आणि समता परिवाराच्या वतीने अभिनंदनचा वर्षाव होत असून प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. तसेच देशातील विविध पतसंस्था फेडरेशन कडून ही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे