कोपरगाव शहरातील बाजारपेठ समृद्ध करायला सरसावले युवा व्यापारी…
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगाव शहरातील बाजारपेठ समृद्ध करायला सरसावले युवा व्यापारी…
कोपरगाव : तालुक्यात व्यापारी महासंघाच्या माध्यमातून स्थानिक बाजारपेठेला वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत ऊर्जितावस्था प्राप्त होत असून स्थानिक ग्राहक आपल्या गावातच खरेदी करायला लागला असून आता कोपरगावची बाजारपेठ फुलवायला शहरातील युवा व्यापारी ही सरसावले आहे. शहरातील प्रत्येक भागातील छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांचे संघटन करून त्यांचे व्यवसाय वृद्धिंगत व्हावे. शहराच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी.तसेच बाजारपेठ समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विशेष निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी दिली.
कोपरगाव तालुक्याच्या वैभवात भर घालणारे तरुण, तडफदार उद्योजक, व्यापारी कोपरगावच्या झपाट्याने बदलत्या व वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठेतील लढणाऱ्या युवा व्यापाऱ्यांसाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्यावतीने दिपावली फराळ व व्यापारी महासंघ युवा आघाडी पदाधिकारी निवड बाबतीत प्राथमिक स्वरूपाची बैठक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली समता पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात उत्साहात संपन्न झाली.
शहरातील युवा व्यापाऱ्यांनी या बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद देत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, संचालक केशवराव भवर , नरेंद्र कुर्लेकर , प्रदीप साखरे , संतोष गंगवाल , गुलशन होडे , महावीर सोनी , किरण शिरोडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी महासंघ युवा आघाडीची प्राथमिक स्वरूपाची बैठक घेऊन स्थापना करण्यात आली.
कोपरगाव शहराच्या अत्यंत जवळून जात असलेल्या समृद्धी महामार्ग मुळे होणारे फायदे , शिर्डी कोपरगाव दरम्यान होणारी औद्योगिक वसाहत यामुळे भविष्यात वाढणारे कोपरगावचे महत्व या बाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अनमोल मार्गदर्शन करत युवा व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
बाजारपेठ विकासाच्या विविध पर्यायांवर निर्णय घेण्यात आले. शहरातील सर्व युवा उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शनपर उपक्रम , ग्राहक जागृती , सामाजिक कार्ये , बाजारपेठेतील रस्त्यावरील वाहतुक , पार्किंग याविषयी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले .
तर शहरातील विविध व्यापारी पेठेतील त्या त्या भागातील युवा व्यापाऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात निवड करण्यात आली. बाजारतळ भागाची जबाबदारी संकेत दरक , हर्षल जोशी ,आशिष लोढा. शिवाजी रोड भागाची जबाबदारी परेश उदावंत , किरण शिरोडे. गोदाम गल्ली भागाची जबाबदारी प्रीतम बंब , देवेश बजाज. संजीवनी परिसर भागाची जबाबदारी अभिषेक कुर्लेकर , साईनाथ गोर्डे , स्वप्नील भवर , मेन रोड भागाची जबाबदारी उल्हास गवारे , पवन डागा , येवला रोड भागाची जबाबदारी निकेतन देवकर , साईनाथ गोर्डे , आशिष बेदमुथा. कापड बाजार भागाची जबाबदारी धीरज कराचीवाला , दत्ता शिरोडे आणि सोशल मीडियाची जबाबदारी ओंकार भट्टड , हर्षल कृष्णानी यांच्याकडे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी केले. विविध क्षेत्रातील ५० हून अधिक तरुण, नव उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे संचालक महावीर सोनी यांनी मानले.