चेक बाऊन्स झाल्याने समताचा थकबाकीदार कादिर मोहम्मद इस्माईल शेख यास कारावासाची शिक्षा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
चेक बाऊन्स झाल्याने समताचा थकबाकीदार कादिर मोहम्मद इस्माईल शेख यास कारावासाची शिक्षा
कोपरगाव : येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव शाखा – अहमदनगर यांचेकडुन कर्जदार कादिर मोहम्मद इस्माईल शेख यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला १ लाख रुपयांचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर अहमदनगर येथील फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्युमेंट ॲक्ट १८८१ चे कलम १३८ खाली फौजदारी कारवाई केली. त्यात चौकशी अंती आरोपी कादिर मोहम्मद इस्माईल यांनी गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने अहमदनगर येथील मे.ज्युडीशिअल मॅजिस्ट्रेट साहेब यांनी आरोपीस १ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाच्या निर्णयानुसार फिर्यादी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या, कोपरगांव, शाखा – अहमदनगर यांना थकबाकीदार कादिर मोहम्मद इस्माईल शेख यांनी एकुण १ लाख १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. संस्थेस नुकसान भरपाई देण्यात कसुर केल्यास किंवा नुकसान भरपाईची रक्कम १ महिन्याच्या आत आरोपीने न दिल्यास आणखी २ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.असा आदेश अहमदनगर येथील १६ वे अतिरिक्त चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हुसेन साहेब यांनी पारीत केलेला आहे. तसेच आरोपी विरुद्ध शिक्षेचे वॉरंट काढण्यात आले. या कामी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या कोपरगांव यांचेतर्फे ॲड.गोरक्षनाथ तांदळे, ॲड.सौ.वृषाली तांदळे यांनी कामकाज पहिले. त्यांना ॲड.बी.एन.खेडकर यांनी सहाय्य केले.फिर्यादी तर्फे शाखाधिकारी नरेश गुंजाळ यांनी दिलेला जवाब महत्वाचा ठरला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील कलम १०१, कलम १५६ हे सहकारातील अतिशय कठोर कायदे आहेत. त्यामुळे जप्तीला उशीर लागला, तर आज ना उद्या पैसे भरावेच लागतात, देणे चुकत नाही. त्यामुळे कर्जदारांनी वेळेत व्याज भरून रिबेटच्या फायदा घ्यावा. तसेच कर्जदारांनी कोणत्याही पतसंस्थेस दिलेला चेक पास करता आला पाहिजे.अन्यथा अशा प्रकारची शिक्षा होऊन तुरुंगवासाची वेळ येऊ शकते याचे भान ठेवावे.असे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले.