समता इंटरनॅशनल स्कूल काळाची गरज ओळखून अध्यापन करते – अनिल कर्डिले
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूल काळाची गरज ओळखून अध्यापन करते – अनिल कर्डिले
कोपरगाव : संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात.त्या आधारे समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील अभ्यास करुन सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे तयार करून संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवावा.समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सुजन शक्तीचा विकास करणे ही काळाची गरज ओळखून त्यांना अध्यापन करत असून विद्यार्थ्यांनीही अध्ययन प्रक्रियेच्या माध्यमातून उपयोग करून घेतला पाहिजे.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल कर्डिले यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. एके सायन्स फाउंडेशन अकॅडमी अध्यक्ष अनिल कर्डिले आणि कोठारी क्लासेस अध्यक्षा मयुरी कोठारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध ध्येय समोर ठेवून समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करून वेगवेगळी प्रात्यक्षिके करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली होती.
विज्ञान प्रदर्शनात समता इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गणित, विज्ञान, संगणकीय शास्त्र या अंतर्गत वेगवेगळी उपकरणे विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनविली होती. जर्नी एक्सप्लोरेशन विथ सिड टू स्पलिग यात वेगवेगळे झोन तयार करून विद्यार्थ्यांनी सृजनशक्ती व कल्पनाशक्तीच्या आधारे नवनवीन समाजोपयोगी उपकरणे, साधने बनवून प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांची मने जिंकली. गणित, विज्ञान, संगणकीय शास्त्राच्या विषयांच्या शिक्षकांचे मुलांना अनमोल मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून बनविलेल्या वस्तूंबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे, प्राचार्य हर्षलता शर्मा, उपस्थित पालक वर्ग यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थिनी सृजना भिंगारदिवे हिने केले. पाहुण्यांचा परिचय शिक्षक आकाश मिश्रा यांनी करून दिला.उपस्थितांचे आभार सरिन सय्यद यांनी मानले.