गुजरात राज्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची ‘समता’ च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
गुजरात राज्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची ‘समता’ च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास गुजरात राज्यातील सुरत येथील हॅपी युथ अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी अध्यक्ष दिनेशकुमार लाहेरी, मंत्री ऑफ विवेकानंद को – ऑप क्रेडिट सोसायटी अध्यक्ष हितेश हिरपारा, डायमंड सिटी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी अध्यक्ष संजय साखरेलिया, श्रीनाथजी अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी संचालक संजय कोटट यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड, ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, सेल्फ बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम आदी राज्यातील पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक कार्य प्रणाली विषयी सविस्तर माहिती दिली.
समता महिला बचत गटाच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ‘सहकार उद्योग मंदिर’ आणि ‘समताज सहकार मिनी मॉल’ द्वारा तालुक्यातील विविध बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादित मालाला एक हक्काच्या विक्री केंद्राविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेचे संचालक अरविंद पटेल, जनरल मॅनेजर सचिन भट्टड व संजय पारखे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज व अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार्यप्रणाली, सहकार उद्योग मंदिर, समताज सहकार मिनी मॉल विषयी मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल श्रीनाथ अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी संचालक संजय कोटट यांनी आभार मानले आणि पुढील आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.