देश-विदेशब्रेकिंग

समता परिवाराचा ऋणी राहील – अजय तांबे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता परिवाराचा ऋणी राहील – अजय तांबे

कोपरगाव : समता महिला बचत गट संचलित सहकार उद्योग मंदिराच्या माध्यमातून मला समता परिवारात येण्याची संधी मिळाली. या मुळे मी समता परिवारात प्रामाणिकपणे काम करत गेलो. मला व माझ्या परिवाराला समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांनी वेळोवेळी मदत करून अंधत्वावर मात करून जीवनात यश संपादन करण्यासाठी अनमोल सहकार्य केल्याबद्दल मी समता परिवाराचा कायमच ऋणी राहणार असल्याचे आय.डी.बी.आय बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदी निवड झालेल्या अजय तांबे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील अजय नाना तांबे यांचा आय.डी.बी.आय बँकेत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल समता नागरी सहकारी पतसंस्थेत माजी तहसिलदार डी.आर. दुशिंग त्यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मनोगत व्यक्त करताना समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे म्हणाले की, अजय तांबे हा दृष्टीहिन नसून आपल्या अंधत्वावर मात करून कमजोरीला ताकद बनवून यश संपादन करणारा अजय तांबे आहे. त्याने स्वतःबरोबरच आपल्यासारख्या अंध व्यक्तींचाही विचार करत असे, दिवाळीच्या सणानिमित्त तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, दान करणाऱ्या व्यक्तींकडून दोन महिने पुरेल इतके किराणा वस्तूंचे किट इतरही अंध व्यक्तींना वाटप करीत असे. प्रामाणिक व सामाजिक दायित्वाची जाण असणाऱ्या व्यक्तीला मिळालेले यश हे कौतुकास्पद आहे.
अजय तांबे कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कै.नानासाहेब तांबे यांचे चिरंजीव आहे. वडील ऊसतोड कामगार होते. त्या नंतर कांद्याच्या चाळी बांधणे, शेतातील पेरणी नांगरणी असे अनेक कामे करत होते. हालाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या मुलांना शिकविले.अजय तांबे हे दृष्टिहीन असून त्यांनी पदवी पास झाल्यानंतर बँकेच्या परीक्षा दिल्या होत्या. तसेच समता महिला बचत गटाच्या सहकार उद्योग मंदिर, समताज सहकार मिनी मॉल आणि समता पतसंस्था संचलित कोपरगाव बस स्थानकावरील माणुसकीच्या मंदिरात काम करत अभ्यास करून अपंग, अनाथ, अंध आदींना एक आदर्श निर्माण केला आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्य कार्यालयाच्या एच.आर.श्रीमती उज्वला बोरावके यांनी केले.अजय तांबे यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपिका तांबे यांनाही साडी, चोळी देऊन सत्कार करण्यात आला. मुलगी ईश्वरीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली. या वेळी मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कोपरगाव शाखाधिकारी योगेश मोरे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे