महात्मा बसवेश्वरांच्या वचन स्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
महात्मा बसवेश्वरांच्या वचन स्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न
कोपरगाव : महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती यांना विरोध करून धार्मिकतेबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला दिला. तसेच साहित्यातून वीरशैव लिंगायत धर्माविषयीची शिकवण, विचार, वचने समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविली. त्यांचे विचार, त्यांनी लिहिलेली वचने यांची आज ही समाजाला गरज आहे. त्यांचे विचार, वचने ही सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक प्रगतीचा मूलमंत्र असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने ती स्वीकारली पाहिजे. असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी केले.
कोपरगाव शहरातील निवारा परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या ८९३ व्या जयंतीनिमित्त कशिदा निवासस्थानाजवळ महात्मा बसवेश्वर यांच्या वचन स्तंभाचे लोकार्पण लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लिंगायत समाजाचे नेते काका कोयटे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य हे महात्मा बसवेश्वरांच्या विचारांशी सांगड घालणारे आहे. त्यांनी बसवेश्वरांच्या विचारांचे व वचनांचे आचरण करून शून्यातून विश्व निर्माण केले. तसेच समाजातील तळागाळातील बांधवांनाही बसवेश्वरांच्या विचारांच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.
महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोपरगाव तहसील कार्यालयात तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते व तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली तर तालुक्यातील कुंभारी येथे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांचा सत्कार लिंगायत समाजाचे नेते काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच लिंगायत समाजातील ललित निळकंठ यांची कुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व आरव निळकंठ याचा प्रकाश साबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लहान वयात आरव निळकंठ याने महात्मा बसवेश्वरांविषयीची माहिती मनोगतातून व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लिंगायत संघर्ष समिती युवा अध्यक्ष प्रदीप साखरे यांनी केले. या वेळी लिंगायत संघर्ष समिती समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव तालुका लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष अमोल राजुरकर, कोपरगाव नगरपालिका माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, गोपीनाथ निळकंठ, भालचंद्र विभुते, संदीप कोयटे, सतीश निळकंठ, वाल्मीक निळकंठ, अतुल निळकंठ, श्याम जंगम, बाबासाहेब जंगम, नितीन भुसारे, गिरीश सोनेकर, अमोल साखरे, दीपक हिंगमिरे, दिलीप घोडके, प्रकाश घोडके,दिगंबर भुसारे, दिगंबर लोहारकर, सौ.छाया सोनेकर, सौ.कल्पना हिंगमिरे, सौ.मंगल साखरे, सौ.उज्वला सरडे आदींसह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका लिंगायत महिला मंडळ अध्यक्षा सौ.प्रीती साखरे यांनी मानले.