ब्रेकिंग

समताची ३९ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताची ३९ वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्चला दुपारी ३ वाजता अन् ऑडिटेड बॅलन्स शीट आणि ११ मे ला ऑडिटेड बॅलन्स शीट जाहीर केली जात असतात. या बाबत कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट न करता, कमीत कमी शाखांमध्ये वेळेवर आर्थिक पत्रके जाहीर करणारी समता पतसंस्था महाराष्ट्रातील सर्व प्रथम व एकमेव पतसंस्था ठरली असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा प्रकारचे उद्गार समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेची ३९ वी सर्वसाधारण सभा ११ मे २०२४ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

तसेच संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम विषयी सविस्तर माहिती देत समतात ९९ . ८१ टक्के ठेवीदारांच्या ठेवी प्रत्येकी ३५ लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले तर जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इति वृत्तांत सांगितला. तसेच कोपरगाव नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज पापडीवाल नायब तहसीलदार चंद्रकांत कुलथे यांच्या उपस्थितीत संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

नाशिक येथील संस्थेचे सभासद शाम झारेकर, कोपरगाव येथील चंद्रकांत शिंदे, गौरव अग्रवाल, रंगनाथ सूर्यवंशी स्वप्निल बाफना, किशोर कुलकर्णी, आकाश मिश्रा, तिलकशेठ अरोरा, रुपेश शिरोडे, अरिफ अत्तार अकबर शेख, सिराज अत्तार या सभासदांचा संस्थेच्या संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत शिंदे म्हणाले की, समता ही एक वेगवेगळ्या व्यक्तींच्या अवयवांपासून बनविलेली एक सुदृढ रचना आहे. काका कोयटे संस्थेचा मेंदू, संचालक डोळे, छोटा मेंदू, अधिकारी, कर्मचारी हात, पाय, रक्तवाहिन्या आहे तर ठेवीदार हे फुफ्फुस असून हे हृदय कर्जदार आहे. हे सगळे अवयव चांगले काम करत असल्यामुळेच समता भक्कम स्थितीत आहे.

हृदयाला काही आजार झाला तर त्यासाठी समताची डॉक्टरांची टीम असते. वेग वेगळ्या प्रकारे हृदयावर म्हणजेच कर्जदारावर चांगल्या प्रकारे उपचार करून हृदयाची काळजी घेत असते. तसेच फुफ्फुस म्हणजे ठेवीदार यांना ही उत्कृष्ट सेवा देत असते. दोघांमध्ये समन्वय साधत समताचे नाव संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी परदेशातही पोहोचविले आहे.

या सर्वसाधारण सभेला संस्थेचे संचालक जितुभाई शहा, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, संदीप कोयटे, गुलशन होडे, कांतीलाल जोशी, कचरू मोकळ, बोर्ड सेक्रेटरी संतोष मुदबखे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, सौ. ज्योत्स्ना पटेल, संस्थेचे ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार संजय पारखे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे