ब्रेकिंग

समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड भूषणावह – अमिष कुमार, प्राधिकरण अधिकारी

कार्यकारी संपादक - प्रा.पोपट साळवे

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांसोबत जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेला संघ.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड भूषणावह – अमिष कुमार, प्राधिकरण अधिकारी

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने २०२४-२५ या हंगामातील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत विजयी होत विजेतेपद पटकावले. तालुकास्तरीय स्पर्धेतील या विजयामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड ही भुषणावह असल्याचे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्राधिकरण अधिकारी अमिषकुमार यांनी सांगितले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते.

विजयी संघाचे नेतृत्व करणाऱ्या रणवीर मांजरे व प्रतिनिधित्व करणाऱ्या आगम सांड, स्वराज ठाणगे, शमित पवार, युगांत रोडे, ऋषिकेश कोळपे, अमेय केकान, नानासाहेब चव्हाण, शहाजी पिंपळे, धीरज चव्हाण, श्लोक वालतुरे, अखिलेश अनभुले, नंदराज पाटील, शौर्य कुंभार, उदयराज चव्हाण, आलोक सोनी, दर्शन गाजरे आदींचा सत्कार करण्यात आला.समता इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा विभागाचे फुटबॉल शिक्षक शुभम औताडे यांचे ही अभिनंदन केले.

अध्यक्षीय मनोगतात काका कोयटे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे उल्लेखनीय दर्शन घडविले. कर्णधार रणवीर मांजरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने जिल्ह्यातील काही बलाढ्य संघांना पराभूत करून संघातील खेळाडूंनी चुणूक दाखविली. हा विजय खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा आहे.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विनोदचंद्र शर्मा म्हणाले की, उपांत्यपूर्व फेरीत समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने गौतम पब्लिक स्कूलच्या संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत संजीवनी अकादमीचा पराभव करून महाअंतिम फेरीत आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल विरुद्धचा रोमहर्षक सामना जिंकून विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा ४-१ ने पराभव करत विजय मिळविला. समताचा विद्यार्थी शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा प्रकारात निपुण व्हावा. यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलचा क्रीडा विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो.

या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा, आस्वाद मेस विभागाचे अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विजयी संघातील खेळाडूंचे कौतुक करत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे