कोपरगावकरांसाठी संयुक्तपणे निर्णय – भगवान मथुरे, नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
कोपरगावकरांसाठी संयुक्तपणे निर्णय – भगवान मथुरे, नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक
कोपरगाव : कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव नगरपालिका यांच्या सहकार्याने कोपरगाव शहरातील वाहतूक व पार्किंग व्यवस्था, सामाजिक शांतता आणि कोपरगाव तालुक्यातील बाजारपेठ फुलविण्याचा संयुक्तपणे निर्णय घेण्यात आला असून तालुक्यातील इतरही विविध संस्था, संघटनांनी सहकार्य करावे. असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा व्यापारी महासंघ व किराणा मर्चंटच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन व कोपरगाव नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती वरील निर्णय घेण्यात आला.
या वेळी जळगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जगताप, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब, व्यापारी महासंघाचे संचालक गुलशन होडे, महावीर सोनी, कार्याध्यक्ष सुधीर डागा, सचिव प्रदीप साखरे, बाजारतळ व्यापारी महासंघ शाखेचे सचिव हर्षल जोशी, परेश उदावंत आदींसह व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.