समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक इसाक पठाण प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा उत्तीर्ण
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक इसाक पठाण प्राध्यापक पदासाठीची सेट परीक्षा उत्तीर्ण
कोपरगाव : आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची परंपरा चालवत गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडवित असून विद्यार्थी केंद्रित शाळा म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवित आहे. गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांबरोबरच समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षकही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवत स्वतः मधील गुणवत्ता प्रखर बनविण्याचा प्रयत्न करत असतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या राज्यस्तरीय सेट (SET) परीक्षेमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक इसाक शब्बीर पठाण इंग्रजी विषयात उत्तीर्ण होऊन कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
इसाक पठाण यांच्या यशाबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्य डॉ.विनोदचंद्र शर्मा तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून इसाक पठाण यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.