समताचा पाया भक्कम आहे – नंदकिशोर अग्रवाल, उद्योजक
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समताचा पाया भक्कम आहे – नंदकिशोर अग्रवाल, उद्योजक
कोपरगाव : संस्था स्थापन करून ती चालविणे अवघड असते. काकांनी समता पतसंस्था स्थापन करून सभासद हिताच्या नवनवीन व वेगवेगळ्या योजना, उपक्रमांमुळे समता १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींकडे वाटचाल करत आहे. समताच्या आर्थिक प्रगतीचा प्रवास कौतुकास्पद असून समताचा पाया भक्कम आहे. कडक कर्ज वसुली करून समताचे चेअरमन काका व त्यांचे सहकारी संस्था सुरक्षितपणे चालवत असल्याचा अभिमान आहे.असे गौरवोद्गार पुणे येथील उद्योजक नंदकिशोर अग्रवाल यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या समता सहकार सभागृहाचे उद्घाटन पुणे येथील उद्योजक नंदकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते आणि समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभम नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मनोज अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्था सभासद हिताच्या नवनवीन योजना व उपक्रम घेऊन ग्रामीण भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. संस्थेच्या सभासदांचा विश्वास त्यांच्या ठेवींना समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत अभेद्य सुरक्षा कवच सुरक्षितता देऊन संपादन केला आहे. समताच्या प्रत्येक वयोगटातील ग्राहकांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा संस्थेच्या योजना व उपक्रम पोचवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. तसेच नंदकिशोर अग्रवाल समता पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहे. त्यांनी पुण्यात जाऊन व्यापार व व्यवसायात नाव उंचविल्याबद्दल सार्थ अभिमान आहे.
प्रमुख पाहुणे नंदकिशोर अग्रवाल यांचा सत्कार संस्थेचे संचालक जितूभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. शुभम पतसंस्थेचे चेअरमन मनोज अग्रवाल यांच्या सत्कार संचालक अरविंद पटेल यांनी केला. या वेळी संस्थेचे संचालक चांगदेव शिरोडे, कचरू मोकळ, संदीप कोयटे, गुलशन होडे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक संदीप कोयटे यांनी केले व उपस्थितांचे आभार संचालक अरविंद पटेल यांनी मानले.