आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

जाती, धर्म वेगवेगळे असले, तरी सर्वांचे रक्त एकच – संदीप कोयटे, संचालक

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

जाती, धर्म वेगवेगळे असले, तरी सर्वांचे रक्त एकच – संदीप कोयटे, संचालक

कोपरगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृता सारखे असते. रक्तदान करूया, एखाद्याला नवीन आयुष्य देऊया’ या सामाजिक उपक्रमामुळे गरजवंताला रक्ताची कमतरता पडल्यास ती भरून निघणार आहे. तसेच देशात राहणाऱ्या विविध जाती धर्मातील लोकांचे रक्त हे लाल रंगाचे आणि एकच असून प्रत्येकाने एकोप्याने राहिल्यास देशाबरोबर आपल्या तालुक्याचा व गावाचा ही विकास होणार असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले.

समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव, लिंगायत संघर्ष समिती कोपरगाव, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, समता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदाते सामाजिक दायित्व पार पाडत असतात. या ही वर्षी रक्तदात्यांनी समता परिवार व सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वच जाती, धर्मातील रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. प्रत्येक वर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत असून या ही वर्षी ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केलेआहे.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रसंगी समता पतसंस्थेचे संचालक निरव रावलिया यांनी ८७ व्या तर प्रवीण वाणी यांनी १२१ व्या वेळा रक्तदान करून सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडली.

शिबिराला नाशिक येथील समता रक्तपेढीचे डॉ.इरफान खान यांचे विशेष सहकार्य लाभले असून शिबीर यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सुमित भट्टड, व्यापारी महासंघाचे संचालक गुलशन होडे, सदस्य किरण शिरोडे, हर्षल जोशी, समता पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड, समता इंटरनॅशनल स्कूल कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे आदींसह समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव, लिंगायत संघाचे समिती कोपरगाव, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, तालुका किराणा मर्चंट असोसिएशन या संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे