जेष्ठा गौरीचे स्वागत करत समतात केली श्रींची आरती
कोपरगाव – गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना केल्यानंतर तिसऱ्या दिवशी जेष्ठा गौरीचे आगमन होते.या दिवशी श्रींच्या सोबतीला जेष्ठा गौरीचे आगमन होत असते.समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखांमध्ये श्रींची स्थापना केलेली असल्यामुळे संस्थेतही जेष्ठा गौरीचे स्वागत करून १२ सप्टेंबर रोजी खातेदार, सभासद, ठेवीदार, कर्जदार,हितचिंतक आदींच्या हस्ते श्रींची सकाळ आणि संध्याकाळची आरती करण्यात आली.
आज नाशिक शाखेतील ठेवीदार श्री रमेश दशरथ माळोदे यांच्या हस्ते सकाळी तर खातेदार सौ शीतल कल्पेश पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.शिर्डीतील खातेदार श्री किरण गोंदकर यांनी सकाळी तर खातेदार श्री राहुल जगताप यांच्या हस्ते शिर्डी शाखेत आरती करण्यात आली.
श्रीरामपूर शाखेचे ठेवीदार श्री विजय गुळस्कर, येवला शाखेच्या ठेवीदार श्री व सौ पुणेकर,नांदेड शाखेत श्री देशमुख, वैजापूर शाखेत खातेदार व वैजापूर शहराचे श्री हरिदास बागडे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. तसेच राहुरी, कोपरगाव शाखेतही आरती करण्यात आली. सर्व शाखेत आरतीनंतर उपस्थित सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी आदींना श्रीं च्या आरती निमित्त तयार करण्यात आलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.