आज समताच्या शाखांमध्ये सत्यनारायण महापूजा आणि आरती
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
आज समताच्या शाखांमध्ये सत्यनारायण महापूजा आणि आरती
कोपरगाव– समता नागरी सहकारी पतसंस्था नेहमीच ग्राहक,सभासदांसाठी विविध योजना,उपक्रम राबविणारी पतसंस्था आहे.त्यातीलच एक उपक्रम म्हणजे गणेश चतुर्थी निमित्त संस्थेच्या प्रत्येक शाखेत झालेले श्रींचे आगमन होय. १० सप्टेंबरला श्रींचे आगमन झाले आणि आता अनंत चतुर्थी काही दिवसांवर आली आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी विविध ठिकाणी विराजमान असलेल्या गणरायांना निरोप दिला जातो,पण त्या आधी गणरायाची विधीवत पूजा करून सत्यनारायणाची महापुुजा केेली जाते.
त्या प्रमाणेच समताच्या कोपरगाव शाखेत सत्यनारायणाची विधिवत महापूजा झाली असून आज नाशिक आणि राहुरी शाखेत सत्यनारायणाची महापूजा संस्थेच्या सभासदांच्या हस्ते करून आरती करण्यात आली.
समता पतसंस्थेच्या नाशिक शाखेत १८ सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा आणि आरती अल्प बचत प्रतिनिधी श्रीं महेश जोशी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली तर संध्याकाळची आरती श्री गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. राहुरी शाखेत सत्यनारायण महापूजा आणि सकाळची आरती श्री प्रदीप डावखार यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.
तसेच संस्थेच्या इतर शाखात सभासद,ठेवीदार, कर्जदार आदींच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.कोपरगाव शाखेत सकाळची आरती सौ प्राची व श्री चेतन उराडे तर सायंकाळची आरती वेलकम शॉपीचे मालक सौ प्रियंका व श्री अक्षय सोनेकर यांच्या हस्ते करण्यात आली.
नांदेड शाखेचे ठेवीदार डॉ सुभाष हुरणे यांनी सकाळी तर सायंकाळी ठेवीदार श्री शैलेश परतानी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. वैजापूर शाखेत सकाळी श्री.खंडगौरे यांनी तर सायंकाळी सभासद श्री सुदामप्पा गोंधळे यांनी गणेशाची आरती केली. येवला शाखेचे ठेवीदार वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवाशी सौ.व श्री.त्रिभुवन यांनी सकाळी तर सायंकाळी सौ व श्री गायकवाड यांनी आरती केली.
शिर्डी शाखेतील ठेवीदार श्री श्रीकांत वारुळे यांनी श्रींची आरती सपत्नीक केली. श्रीरामपूर शाखेत सकाळी सभासद श्री दिलीप बोर्डे यांनी तर सायंकाळी श्री गणेश वडनेरे यांचे हस्ते आरती करण्यात आली.
आरती नंतर शाखांमध्ये उपस्थित असलेले सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, शाखाधिकारी, कर्मचारी आदींना प्रसादाचे वाटप करण्यात आले.