सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुक्यातील किराणा मर्चंट असोसिएशन व व्यापारी महासंघ यापुढे एकत्रित काम करणार – श्री.राजकुमार बंब, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुक्यातील किराणा मर्चंट असोसिएशन व व्यापारी महासंघ यापुढे एकत्रित काम करणार – श्री.राजकुमार बंब,अध्यक्ष
कोपरगाव : मॉल संस्कृती, खोट्या जाहिरातीमुळे ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक यांसारख्या अनेक समस्यांना बाजारपेठेतील छोटे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे, तर काही या समस्यांचे बळी ठरत आहे. या विरोधात कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन आणि व्यापारी महासंघ सरकार विरोधात अनेक आंदोलने, मोर्चे काढून कोपरगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांना बळ देत आले आहे. एक्स्पो, मेळावे आयोजित करून खरेदी – विक्रीचे दालन खुले करून देत असतात. छोट्या – मोठ्या व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठी करत असलेली ही संघटित चळवळ महाराष्ट्रातील व्यावसायिक, व्यापाऱ्यांनाही व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची ठरावी यासाठी कोपरगाव तालुक्यातील किराणा मर्चंट असोसिएशन व व्यापारी महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ यापुढे एकत्रित काम करणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब यांनी दिली.
समता नागरी सहकारी पतसंस्थेत ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. नितीन वाळके, संचालक श्री.नंदन वेंगुर्लेकर, श्री.प्रकाश वाळके, श्री. संदीप टोपले, श्री.अमित पंडित आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असो.चे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब , व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.सुधीर डागा, सचिव श्री.प्रदीप साखरे, धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष श्री.गुलशन होडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव श्री. नितीन वाळके म्हणाले की, महाराष्ट्रातील व्यापार वृध्दीसाठी एकत्रित काम करणे ही व्यावसायिक, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची पतसंस्था सुरू केली आहे. तिला डिजिटल स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, अधिकारी यांचे मार्गदर्शन घेणार आहोत.
प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव श्री.नितीन वाळके यांचा सत्कार कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असो.चे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब, संचालक श्री.नंदन वेंगुर्लेकर यांचा सत्कार धारणगाव रोड शाखेचे अध्यक्ष श्री. गुलशन होडे, संचालक श्री.प्रकाश वाळके व सल्लागार श्री.अमित पंडित यांचा सत्कार कार्याध्यक्ष श्री.सुधीर डागा तर श्री संदीप टोपले यांच्या सत्कार सचिव श्री.प्रदीप साखरे यांच्या हस्ते करण्यात आला. बैठकीचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री दादा यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव श्री.प्रदीप साखरे यांनी मानले.