सौ कल्याणी कोयटे-हुरणे यांचे कोपरगावच्या अनेक महिला ब्युटीशियनला लाभले मार्गदर्शन
कार्यकारी संपादक प्रा पोपट साळवे
सौ कल्याणी कोयटे-हुरणे यांचे कोपरगावच्या अनेक महिला ब्युटीशियनला लाभले मार्गदर्शन
कोपरगाव : ब्युटीशियन यांनी मेकअप कसा करायचा हे शिकायचे नसते तर मेकअप करण्यासाठी आवश्यक असणारे टेक्निक शिकायचे असते.कोपरगावच्या प्रत्येक महिलेमध्ये ब्युटी पार्लरचे कोर्सेस शिकण्याची भूक पाहिजे.त्यामुळे प्रत्येक महिलेला या कलेतून रोजगार ही उपलब्ध होत असतो.या क्षेत्रात नेहमी बदल होत असतो त्यामुळे प्रत्येक ब्युटीशियन महिलेने बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवावे.असे प्रतिपादन इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट सौ कल्याणी कोयटे-हुरणे यांनी केले.
समता पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात कोपरगाव शहरातील आर्या ब्युटी पार्लर आयोजित एकदिवसीय प्रोफेशनल मेकअप सेमिनारमध्ये कोपरगाव शहरातील सर्व ब्युटीशियन आणि या क्षेत्रात नवीन करिअर करू इच्छिणाऱ्या महिला व मुलींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. पुढे म्हणाल्या की,माझा जन्मच कोपरगाव शहरातील कोयटे कुटुंबात झाला असून आज माझ्या भगिनींना मी सेमिनारच्या माध्यमातून काही तरी देऊ शकते याचा मला अभिमान आहे.आज दिवसभर चालणाऱ्या सेमिनारचा शहरातील सर्वच महिलांनी एक सुवर्णसंधी म्हणून लाभ घ्यावा.
सेमिनारचे प्रास्ताविक आर्या ब्युटी पार्लरच्या व्यवस्थापिका सौ.अंजली चिने यांनी केले.त्या म्हणाल्या की, ब्युटी पार्लर क्षेत्रात अनेक नव-नवीन बदल होत आहे तसेच अनेक महिला व तरुणी या क्षेत्रात येऊ पाहत आहे.अशा महिला व तरूणींना नवीन कोर्सेसची माहिती देण्यासाठी नांदेड येथील इंटरनॅशनल मेकअप आर्टीस्ट सौ कल्याणी हुरणे यांची आतुरतेने वाट पाहत होत्या.यांची आकाशवाणी व दूरदर्शन वर मेकअपविषयी व्याख्याने होत असतात. त्यांनी मेकअप केलेल्या अनेक महिलांना यश मिळालेले असून नुकतेच दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत कल्याणी हुरणे यांनी मेकअप केलेल्या नाशिकच्या अनन्या शिंदे यांना मिस इंडिया किताब मिळालेला आहे.नांदेड शहरात गिल्ट्स वूमन सलून अकॅडमी च्या माध्यमातून ५०० हून अधिक महिलांना प्रशिक्षण दिले जाते.
मार्गदर्शन करणाऱ्या सौ कल्याणी हुरणे यांचे स्वागत आणि परिचय कमलेश कोते यांनी करून दिले तर त्यांचा सत्कार आर्या ब्युटी पार्लरच्या व्यवस्थापिका सौ.अंजली चिने यांनी केला.
कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे,समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे,ब्युटी पार्लर क्षेत्रात पारंगत असणाऱ्या अहमदनगरच्या सौ.जयश्री पोटे,शिर्डीच्या सौ साधना देहरेकर,येवल्याच्या सौ प्रीती पटणी,मनमाडच्या सौ सुप्रिया जाधव,सौ मानसी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.या सेमिनारला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार सौ योगिता गोसावी यांनी मानले.