प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रक्तात सुरक्षितता पाहिजे – पो.नि.श्री वासुदेव देसले; समताच्या कर्मचाऱ्यांना केले ऑनलाईन मार्गदर्शन
समता वार्ता कार्यकारी संपादक पोपट साळवे
प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रक्तात सुरक्षितता पाहिजे – पो.नि.श्री वासुदेव देसले; समताच्या कर्मचाऱ्यांना केले ऑनलाईन मार्गदर्शन
कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थिती सरकारी बँकेला लाजवेल अशी असून महाराष्ट्रात होत असलेल्या दरोड्याच्या घटनांमुळे बँका, पतसंस्थांनी विविध उपाय योजना तयार करणे महत्त्वाचे आहे.पतसंस्थांच्या प्रत्येक अधिकाऱ्यापासून ते शिपायांपर्यंत प्रसंगावधान,समयसूचकता साधून स्वतःच्या सुरक्षितते बरोबरच संस्थेची देखील सुरक्षा करता आली पाहिजे त्यासाठी प्रत्येकाच्या रक्तातच सुरक्षितता पाहिजे. असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात ‘पतसंस्था दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना’ या विषयाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली समताच्या २४० हून अधिक कर्मचाऱ्यांना झूम मिटिंग च्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते बोलत होते.
तसेच ते पुढे म्हणाले की, मी वेगवेगळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक म्हणून जात असतो त्या ठिकाणी माझा सत्कार शाल,गुलाबाचा गुच्छ देऊन करतात पण समतातील सत्कार हा भावनिक दृष्ट्या नाळ घट्ट करणारा असून याचे वेगळेपण म्हणजे समता महिला बचत गटाच्या महिलांनी अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ होय.
प्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले पो.नि.वासुदेव देसले यांचे स्वागत संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी केले तर जेष्ठ संचालक श्री अरविंदजी पटेल यांच्या हस्ते शाल आणि समता महिला बचत गटाच्या महिलांनी अगरबत्ती व कापूर एकत्र बांधून तयार केलेला गुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
जेष्ठ संचालक श्री अरविंदजी पटेल आभार व्यक्त करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता पतसंस्थांना दरोडा प्रतिबंध सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक पतसंस्थेने विविध उपाय योजना करून त्या राबविणे काळाची गरज बनली आहे त्यामुळे समताच्या दृष्टीनेदेखील सुरक्षिततेच्या बाबतीत नियोजन करण्यात आले असून विविध उपाय योजनांबाबत कर्मचाऱ्यांना ही सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या ऑनलाईन मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.ज्याप्रमाणे प्रत्येक कर्मचारी स्वतःच्या घराची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतो त्याप्रमाणेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या पतसंस्थेची सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे.
प्रसंगी समताचे जेष्ठ संचालक श्री चांगदेव शिरोडे, श्री संदीप कोयटे,श्री गुलशन होडे, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सदर ऑनलाईन मार्गदर्शन मिटींगचे सुत्रसंचालन ई.डी.पी.विभागप्रमुख श्री योगेश आसने यांनी केले तर उपस्थितांचे आभार जेष्ठ संचालक श्री अरविंदजी पटेल यांनी मानले.