समताची विश्वसनीय कार्यप्रणाली – काशिनाथ दाते, चेअरमन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
समताची विश्वसनीय कार्यप्रणाली – काशिनाथ दाते, चेअरमन
कोपरगाव : अनुभव व नेतृत्वाने काका कोयटे यांनी समता पतसंस्था ही सुस्थितीत उभी केली आहे. तसेच त्यांनी सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या विविध विश्वसनीय कार्यप्रणालीमुळे पतसंस्था राज्यात अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखली जात असल्याचे पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास पारनेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते, संचालक बाळासाहेब सोबले, आर.एस.कापसे, राजेंद्र औटी, अर्जुन गाजरे, लक्ष्मण डेरे, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, सुनील गाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात, वसुली अधिकारी संजय औटी, नियाज राजे, राजेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी, अधिकारी, शाखाधिकारी यांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी सदिच्छा भेट दिली.
या वेळी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज,भव्य इमारत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग हि पतसंस्था चळवळीला दिशादर्शक असणारी अत्याधुनिक बँकिंग प्रणाली विषयी चर्चा केली. चेअरमन काका कोयटे, ठेव प्रमुख संजय पारखे, वसुली अधिकारी जनार्दन कदम यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी पारनेर पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते यांचा तर उपस्थित अधिकारी यांचा सत्कार संजय पारखे यांच्या हस्ते करण्यात आला. समता पतसंस्थेविषयी मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.