ई-पेपरमहाराष्ट्र

काका कोयटे सहकारी पतसंस्थांचे भीष्माचार्य

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली असता डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.हेमंत सुराणा यांनी दिलेला लिखित स्वरूपातील अभिप्राय.

काका कोयटे सहकारी पतसंस्थांचे भीष्माचार्य

दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता समता पतसंस्थेची, कोपरगाव .पायरी चढत असताना मनात खूप जलबिचल होती परंतु आत मध्ये प्रवेश करताच मनावरचे दडपण पूर्णपणे मिटून गेले. मान. काका कोयटे यांना फोन केला .आम्ही आपली भेट घेण्यासाठी आलो आहोत असे सांगताच ते म्हणाले तिथेच थांबा, आमचा माणूस तुम्हाला घ्यायला येईल .एक मिनिटाच्या आत आम्हाला मान. कोयटे काकांच्या केबिनमध्ये नेण्यात आले. आपले चाललेले काम थांबवून काकांनी आमच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. आदल्या दिवशी आम्ही फोनवरच भेट मागितली होती. नावही सांगितले होते गेल्या गेल्या त्यांनी विचारले तुमच्यापैकी सुराणा कोण? मी होकारार्थी उत्तर दिले त्यांनी माझ्यासमवेत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचा परिचय करून घेतला, आम्हाला येण्याचा हेतू विचारला, आमच्या संस्थेत क्यू आर कोड घेण्याचे ठरत होते. त्यांच्या संस्थेमध्ये ही प्रणाली अगोदरपासूनच यशस्वीरित्या कार्यान्वित होती ती बघावी असा मानस होता, परंतु संस्था बघितल्यानंतर, तिचा पसारा बघितल्यानंतर आता संपूर्ण संस्थाच बघून जाऊ असा विचार करत होतो तोच काकांनी त्यांचे श्री पारखे नावाचे कर्मचारी यांना बोलावून आम्हाला संपूर्ण संस्था ,कार्यपद्धती, व्यवस्थापन, संबंधी माहिती देण्यासाठी पाठवले आम्ही सर्व विभागांमध्ये जाऊन सर्व कामकाज समजून घेत होतो व्हाउचर एंट्री मोबाईलवर करणे, संपूर्ण शाखांचे कंट्रोल, पासिंग व ऑडिटिंग करणारे कंट्रोल रूम खरोखर थक्क करणारे होते. त्यानंतर संपूर्ण तेरा शाखा व 26 विस्तारित कक्ष यांचे नियंत्रण करणारे मुख्य कार्यालय, त्यातले अधिकारी त्यांची कामाची विभागणी बघून नियोजन कसे असावे हे पटले .त्यानंतर आम्ही सोने तारण विभागात गेलो काकांनी त्यांच्या संस्थेचा फोकस सोनेतारण या विषयाकडे वळवला आहे .त्यांनी त्यात राबवलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना विचारात पाडून गेल्या. व्याजदरातील बदल, सोन्याचे भाव ठरवताना वापरावयाची निर्णय प्रक्रिया वाखाणण्याजोगी होती. इतक्यात काका स्वतः तिथे आले आम्हाला खूप विशेष वाटले आम्ही काकांना विनंती केली आम्ही संस्था बघतो तुम्ही आमच्या बरोबर सेवेत असल्यासारखे राहू नका तुमचा स्टाफ खूप छान माहिती देत आहे. तुम्ही फार मोठे आहात आपण कार्यालयात थांबा आम्ही तिथे भेटायला येतो. त्यानंतर त्यांनी वसुली विभागाची केलेली रचना व आदर्श नियोजन आम्ही बघितले त्याची कार्यपद्धती ,त्याचे नमुने त्यांनी आम्हाला भेट स्वरूप दिले.

समता पतसंस्थेमार्फत सामाजिक जाणीवेपोटी बचत गटासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या मागची कल्पना ,त्याचे नियोजन, त्यासाठी वापरलेली कल्पकता बघून आपणही असे काहीतरी केले पाहिजे असे भाव मनात आले त्यानंतर आम्ही काकांना भेटण्यासाठी पुन्हा त्यांच्या कार्यालयात आलो तिथे त्यांनी मी हेमंत सुराणा माझे सहकारी श्री मोहनजी बबेरवाल श्री गोरख जी वालझाडे श्री मधुकर जी जाधव श्री रितेश जी काजळे यांचा सन्मान केला, सन्मानासाठी दिलेले बुके सुद्धा अभिनव होते बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या साहित्याचे वापर करून त्यांनी बुके तयार केले होते. अंशदान ,पतसंस्थांचे भविष्य ,सहकार चळवळ आदि विषयावर चर्चा झाल्यानंतर समता पतसंस्था राबवत असलेल्या योजना, ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी करावयाची आर्थिक मांडणी अशा सर्व विषयांवर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम संपत असतानाच जेवणाचा आग्रह केला आम्ही नको नको म्हणत असताना आग्रहाचे रूपांतर आदेशात करून त्यांनी हक्काने अत्यंत रुचकर व आत्मियता पूर्ण भोजनाची सेवा प्रदान केली त्यानंतर आम्ही त्यांनीच उभारलेली शाळा बघण्यासाठी गेलो अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शाळेची उभारणी त्यांनी केली आहे हे सर्व करताना त्यांनी सहकारी चळवळीत व शैक्षणिक चळवळीत संपूर्ण कुटुंबाला कामाला लावले आहे साधारणपणे चार तास आम्ही त्यांच्याबरोबर होतो सहज सलगी देणे, बडेजाव न मिरवणे, दुसऱ्याचे ऐकून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे, अशा अत्यंत लाभवी वागण्यामुळे आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो. जो जोपर्यंत काकांसारखं नेतृत्व सहकार चळवळीला प्राप्त आहे तोपर्यंत ही चळवळ प्रगतीच करत राहणार .अधिक मोठी होणार हा विश्वास मनात घेऊन व आपणही आपली संस्था मोठी करू व काकांना संस्था बघायला बोलवु असा मनोमन संकल्प करत आम्ही काकांचा निरोप घेतला !धन्यवाद!
आपला
श्री.हेमंत सुराणा
डॉ हेडगेवार ग्रा.बि.शेती सह. पत. मर्या.घोटी
मु. पो. घोटी ता. इगतपुरी जि. नाशिक.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे