ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता पतसंस्था सहकार क्षेत्रातील मानबिंदू – श्री राजेंद्र चव्हाण, संस्थापक

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

समता पतसंस्था सहकार क्षेत्रातील मानबिंदू – श्री.राजेंद्र चव्हाण, संस्थापक

कोपरगाव : पतसंस्था चळवळीतील पतसंस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून ग्राहक, सभासदांना स्पर्धेच्या युगात त्वरित सेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.महाराष्ट्रातील समता पतसंस्थेत काकांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जात असून सभासद हित जोपासले जात आहे तसेच नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सभासदांना त्वरित सेवा उपलब्ध करून दिली जाते.समताच्या योजना व उपक्रम हे उल्लेखनीय असून समता पतसंस्था ही सहकार क्षेत्रातील मानबिंदू बनली आहे.असे गौरवोद्गार श्री घाडगेनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र चव्हाण यांनी काढले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास श्री घाडगेनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था,मु.पो.कोळे ता.कराड जि.सातारा चे संस्थापक श्री.राजेंद्र शंकर चव्हाण, चेअरमन श्री.विठ्ठल पाटील, संचालक श्री. महेश पाटील, श्री.महादेव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुधीर शेवाळे, शाखाधिकारी श्री. संदीप पाटील,श्री.सोमनाथ पाटील आदी पदाधिकारी,अधिकारी यांनी २५ ऑगस्ट २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली.

प्रसंगी समता पतसंस्थेच्या वतीने चेअरमन काका कोय यांच्या हस्ते श्री घाडगेनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक श्री. राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तर इतर उपस्थित पदाधिकारी,अधिकारी यांचा सत्कार फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख श्री.संजय पारखे, ईडीपी प्रमुख श्री.योगेश आसणे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड,फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम,समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधीच्या माध्यमातून समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड, समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश, उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली.

त्यानंतर संस्थेचे चेअरमन काका कोयटे, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख श्री संजय पारखे,मुख्य कार्यालयाचे अधिकारी यांनी समता पतसंस्था आणि समता महिला बचत गटाच्या महिला व कर्मचाऱ्यांनी समता सहकार मिनी मॉल,अगरबत्ती व कापूर उत्पादन,समता महिला बचत गट उत्पादित वस्तूंविषयी सविस्तर माहिती दिली.

समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे