ब्रेकिंगमहाराष्ट्र

देशातील सहकार चळवळीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समता पतसंस्था एक महत्त्वाचे स्थान निर्माण करेल – श्री हेमंत सुराणा, अध्यक्ष.

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

देशातील सहकार चळवळीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समता पतसंस्था एक महत्त्वाचे स्थान निर्माण करेल – श्री हेमंत सुराणा, अध्यक्ष.

कोपरगाव : स्पर्धेच्या युगात समता नागरी सहकारी पतसंस्थेत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान हे समता नागरी सहकारी पतसंस्थेला जगाच्या पुढे घेऊन जाणारे तंत्रज्ञान ठरणार असून देशातील सहकार चळवळीमध्ये महाराष्ट्रातील समता पतसंस्था एक महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी संस्था ठरेल.तसेच समता महिला बचत गटाच्या माध्यमातून समता सहकार मिनी मॉल आणि अगरबत्ती व कापूर उत्पादनाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपत महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्यामुळे हा उपक्रम देखील कौतुकास्पद आहे.आम्ही दरवर्षी समता पतसंस्थेचा अभ्यास दौरा करून समतातील अद्यावत व नवनवीन तंत्रज्ञान आमच्या पतसंस्थेत राबविणार असून समताची फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूमची संकल्पना पुढील वर्षापर्यंत आम्ही आमच्या संस्थेत राबविणार आहोत.असे प्रतिपादन डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.हेमंत सुराणा यांनी केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील डॉ.हेडगेवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने २२ ऑगस्ट २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली. या संचालक मंडळात डॉ. हेडगेवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. हेमंत तेजमल सुराणा, संचालक श्री. मोहन केवलचंद बबिरवाल, श्री.गोरख सखाराम वालझाडे, श्री.मधुकर रामदास जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रितेश काजळे यांचा समावेश होता.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्याशी समता पतसंस्थेची सुसज्ज भव्य इमारत,आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग, व्हाऊचरलेस बँकिंग सुविधा, क्यु.आर.कोड, फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभाग, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधीच्या माध्यमातून समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड, समता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी अगरबत्ती, घी बत्ती, कापूर, हँडवॉश,उटणे, फुलवाती, समई वाती, अगरबत्ती आणि कापूर यांना एकत्र बांधून तयार करण्यात आलेला गुच्छ,मास्क,पेटीकोट आणि समताज सहकार मिनी मॉल मधील विक्रीसाठी उपलब्ध वस्तूंविषयी चर्चा केली.

त्यानंतर संस्थेचे चेअरमन काका कोयटे, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम चे प्रमुख श्री संजय पारखे, वसुली अधिकारी श्री जनार्दन कदम, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, समता महिला बचत गटाच्या महिलांनी समता सहकार मिनी मॉल,अगरबत्ती व कापूर उत्पादनाविषयी आणि समता महिला बचत गट उत्पादित वस्तूंविषयी सविस्तर माहिती दिली.

तसेच समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.हेमंत सुराणा यांचा सत्कार केला.इतर संचालकांचा सत्कार फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम प्रमुख श्री संजय पारखे यांच्या हस्ते करण्यात आला.

समता पतसंस्था आणि सहकार उद्योग मंदिराविषयी मिळालेल्या माहितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि समताच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत निरोप घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे